शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात केवळ ६५० शस्त्रक्रिया!

By admin | Updated: May 2, 2017 01:27 IST

महाआरोग्य शिबिरातील शस्त्रक्रिया धिम्या गतीने : रुग्णांना रुग्णालयापर्यंत आणण्यात यंत्रणा अपयशी

अतुल जयस्वाल - अकोलाशासनाच्यावतीने जिल्ह्यात गतवर्षी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात तपासणी झाल्यानंतर शस्त्रक्रिया सुचविलेल्या एकूण रुग्णांपैकी वर्षभरात केवळ ६५० रुग्णांवरच शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आहे. रुग्णांची अनास्था व त्यांना रुग्णालयापर्यंत आणण्यात आरोग्य यंत्रणेला आलेले अपयश यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत ६५० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.अकोला येथे मार्च २०१६ मध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शस्त्रक्रिया, अस्थिरोग, नाक-कान-घसा, नेत्ररोग, दंतशास्त्र, स्त्रीरोग, युरॉलॉजीशी संबंधित हजारांवर रुग्णांची नोंद घेण्यात आली. या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच शहरातील काही खासगी रुग्णालयांकडे शस्त्रक्रियांसाठी ‘रेफर’ करण्यात आले होते. त्यावेळी आरोग्य शिबिरात रुग्णांच्या केवळ प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या होत्या. पुढील तपासण्यांसाठी रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालयात येण्यास सांगण्यात आले होते. वैद्यकीय महाविद्यालयात आलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. यासाठी रुग्णांची अंतिम यादी तयार करण्यात आली. यामध्ये ८०० पेक्षा अधिक रुग्ण होते. त्यानंतर २३ मार्च ते ३१ आॅक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ४१५ रुग्णांवर सर्वोपचारमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या. बहुतांश शस्त्रक्रिया मार्च व एप्रिल महिन्यात पार पडल्या. त्यानंतर मात्र रुग्णांकडून शस्त्रक्रिया करवून घेण्याबाबत फारसे स्वारस्य दाखविण्यात आले नाही. त्यामुळे पुढील सहा महिन्यात शस्त्रक्रियांची गती आणखीनच मंदावली. ३१ आॅक्टोबर २०१६ ते ३१ मार्च २०१७ या सहा महिन्यांच्या कालावधीत केवळ २३३ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अशाप्रकारे २३ मार्च २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत तपासणी झालेल्यांपैकी एकूण ६५० रुग्णांवरच शस्त्रक्रिया झाल्याची नोंद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे आहे.‘आयएमए’कडील आकडा अनुपलब्धमहाआरोग्य शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांवर ‘आयएमए’अंतर्गत काही खासगी रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हा आकडा मात्र अजूनपर्यंत उपलब्ध होऊ शकला नाही. खासगी रुग्णालयातील शस्त्रक्रिया झालेल्यांची माहिती समोर आल्यानंतर एकूण परिस्थिती समोर येऊ शकते.विशेष तपासण्या ११०० वरया शिबिरात नोंदणी झालेल्या रुग्णांना विशेष तपासण्या सूचविण्यात आल्या होत्या. मार्च २०१७ अखेरपर्यंत ११७९ रुग्णांच्या विशेष तपासण्या करण्यात आल्या.स्वस्थ महाराष्ट्र अभियानही ठरू नये फार्स१ मे पासून जिल्ह्यात पंडित दिनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ होणार आहे. गरीब, गरजू रुग्णांकरिता विनामूल्य वैद्यकीय सेवा पुरविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. याच उद्देशाने गतवर्षी घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात नोंदणी झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली आहे. या पृष्ठभूमीवर नव्याने येऊ घातलेले हे अभियानही केवळ फार्स ठरू नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.