शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सावकाराकडून कर्ज घेतलेल्या ४९ शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 13:36 IST

जिल्ह्यातील ३८,५७० शेतकऱ्यांपैकी ४९ शेतकºयांना लाभ मिळाला असून, त्यांचे ३ लाख ९६ हजार रुपयांचे कर्ज शासनाने भरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सावकाराकडून कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ३८,५७० शेतकऱ्यांपैकी ४९ शेतकºयांना लाभ मिळाला असून, त्यांचे ३ लाख ९६ हजार रुपयांचे कर्ज शासनाने भरले आहे. याच अनुषंगाने जिल्हा सहकारी उपनिबंधक कार्यालयाने पुन्हा सावकारांच्या रेकार्ड तपासणीचे काम हाती घेतले आहे.परवानाधारक सावकारांकडून विदर्भ व मराठवाड्यातील शेतकºयांना कर्जमाफी देण्याचा निर्णय २०१५ मध्ये शासनाने घेतला होता. या निर्णयानुसार शासनाने सावकाराचे १७१.३० कोटी रुपये कर्ज भरू न शेतकºयांना कर्जमुक्त केले होते; परंतु ही कर्जमाफी योजना सुरू करताना यामध्ये परवानाधारक सावकाराने परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीस कर्ज दिले असेल तर ती व्यक्ती या योजनेस पात्र असणार नाही अशी अट टाकली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सावकाराकडून कर्ज घेणाºया ३८ हजार ५७० शेतकºयांना ३७ हजार कोेटींची कर्जमाफी होऊ शकली नाही. केवळ ४९ च शेतकरी पात्र ठरले. त्यांची ३ लाख ९६ हजार रुपयांचे कर्ज शासनाकरवी सावकारांना देण्यात आले. तत्कालीन १९६ सावकारांनी जिल्ह्यामध्ये कर्ज केलेल्या बहुसंख्य प्रकरणात लाभार्थी हे सावकारी परवान्यावरील नोंद केलेल्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील होते. त्यामुळेच या सावकारी कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील शेतकºयांना मिळू शकला नव्हता. याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला या कार्यालयामार्फत शासनास अहवालसुद्धा सादर करण्यात आला होता; पण आता पुन्हा शेतकºयांनी या संदर्भात मागणी केल्याने जिल्हा सहकारी उपनिबंधक कार्यालयाने सावकारांची रेकार्ड तपासणी हाती घेतली आहे.

जिल्ह्यातील ४९ शेतकºयांनाच सावकारी कर्ज प्रकरणात शासनाची कर्जमाफी झाली आहे. २०१५ मध्ये कर्ज घेणाºया शेतकºयांचा आकडा हा ३८,५७० होता याच अनुषंगाने रेकार्ड तपासणी सुरू केली असून, शेतकºयांनी स्वत:च्या किंवा नातेवाइकांच्या नावाने शेतीचा सात बारा अर्जासह विहित नमुन्यात अर्ज करावा; पण नोकरदार, पेन्शनधारक किंवा त्यांचा उद्योग नसावा, ही काळजी घ्यावी.- डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा सहकारी उपनिबंधक, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी