शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणाची केवळ ४७ कामे पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 10:31 IST

पावसाळा सुरू झाला असून, उर्वरित ४७९ कामे अद्याप प्रलंबित आहेत.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी ५ जूनपर्यंत पाणीटंचाई निवारणाची केवळ ४७ कामे पूर्ण करण्यात आली असून, ६० कामे प्रगतिपथावर आहेत. पावसाळा सुरू झाला असून, उर्वरित ४७९ कामे अद्याप प्रलंबित आहेत.यावर्षीच्या गत उन्हाळ्यात जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील ४९१ गावांमध्ये विविध ५८६ उपाययोजनांची कामे कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांनुसार १३६ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ११० उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या कामांपैकी ५ जूनपर्यंत जिल्ह्यातील केवळ ४५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४७ कामे पूर्ण करण्यात आली असून, ६० उपाययोजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. उन्हाळा संपला असून, पावसाळा सुरू झाल्याने, ३० जूनपर्यंतच पाणीटंचाई निवारणाची कामे करता येणार आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात प्रस्तावित जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची उर्वरित प्रलंबित असलेली ४७९ कामे ३० जूनपर्यंत पूर्ण कशी होणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पूर्ण केलेल्या कामांचा निधीही प्रलंबित!जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी ४५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४७ कामे पूर्ण करण्यात आली; मात्र पूर्ण करण्यात आलेल्या या कामांचा ६२ लाख १६ हजार रुपयांचा निधीही अद्याप शासनामार्फत जिल्हा परिषदेला प्राप्त होणे प्रलंबित आहे. तसेच जिल्ह्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा निधीदेखील प्रलंबित आहे.

प्रगतिपथावर अशी आहेत कामे!जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाची ६० कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामध्ये ७ तात्पुरत्या पूरक नळयोजना, १८ नळयोजनांची विशेष दुरुस्ती, १५ नवीन विंधन विहिरी व २० हातपंपांची दुरुस्ती इत्यादी उपाययोजनांच्या कामांचा समावेश असून, सुरू असलेली ही कामे ३० जूनपर्यंत पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी होती. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कमीत-कमी कामे करण्यात आली. ‘कोरोना’संकटाच्या पृष्ठभूमीवर पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी निधीदेखिल उपलब्ध नाही.- किशोर ढवळेकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई