शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

१0 हजार लोकांमागे केवळ १९ आरोग्य कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 10:03 IST

आताच्या लोकसंख्येच्या तुलनेत अवघ्या १० हजार नागरिकांच्या मागे केवळ १९ आरोग्य कर्मचारी उपलब्ध असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना महामारीच्या काळात आरोग्य यंत्रणा देवदूतासारखी कार्य करत आहे; मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. अकोला जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा मागोवा घेतला असता आताच्या लोकसंख्येच्या तुलनेत अवघ्या १० हजार नागरिकांच्या मागे केवळ १९ आरोग्य कर्मचारी उपलब्ध असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात शहरी व ग्रामीण मिळून आरोग्य विभागात ३ हजार ५२७ अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांची कार्यरत असून ५२८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कोरोनाच्या संकटाच्या काळात या आरोग्य कर्मचाºयांवर जिल्ह्याचा डोलारा सध्या उभा आहे; मात्र सध्या प्राप्त परिस्थितीत प्रसंगानुरूप आरोग्य यंत्रणा परिस्थिती हाताळत असून, कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी झटत आहे. सर्वोपचार रुग्णालयात मनुष्यबळाची कमी आहे त्या कर्मचाºयांवरील ताण वाढला आहे. हा ताण कमी करण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर जागा भरण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ही कंत्राटी तत्त्वावरील पदे एकास चार या प्रमाणे भरली जाणार आहेत. म्हणजेच चार रुग्णांसाठी एक पद भरले जाणार असल्याची माहिती आहे. यामध्ये परिचारिका, कोविड वॉर्डासाठी फार्मासिस्ट, डाटा एंट्री आॅपरेटर, आयुष डॉक्टर आदी पदांचा समावेश असणार आहे.दुसरीकडे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत राज्याच्या आरोग्य विभागात गत १५ वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहे. दरम्यानच्या काळात तत्त्वावर पदभरती करण्यात आली होती. त्यानुसार ४१ परिचारिका आणि २३ वर्ग चारचे कर्मचारी नियुक्तीनंतर रुजूही झालेत; मात्र कोरोनाच्या धसक्यामुळे यातील काही कर्मचारी पुन्हा आलेच नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

कोरोना उपाययोजनांवर ३.४१ कोटींचा खर्च!कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ३० जुलैपर्यंत विविध उपाययोजनांवर ३ कोटी ४१ लाख ४७ हजार ८६२ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.अकोला महापालिकेने तब्बल ६६ लाखांचा खर्च आतापर्यंत केला आहे; मात्र पालिकेला शासनाकडून ४0 लाख मिळलो.

सर्वोपचारवर ताणशासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयावर कोरोनाचा सर्वाधिक ताण आहे. कोरोनाबाधित रुग्णांची व्यवस्था करताना आरोग्य यंत्रणेची मोठी धावपळ उडत आहे. त्यामुळे येथील यंत्रणेवर सगळ््यांचे लक्ष लागले आहे.लढाई कोरोनाशी!मनुष्यबळ कमी असले तरी आरोग्य विभागा योद्धाप्रमाणे कोरोनाच्या लढाईत उतरला आहे. अकोला मनपा क्षेत्रात आरोग्य विभागाच्या कर्मचाºर्यांचे परीश्रम व नागरिकांचे सहकार्य तसेच मनपा आयुक्त व सर्वांचे मार्गदर्शन यामुळे शहरातील कोरोना संसर्गावर बºयापैकी नियंत्रण मिळविले आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे अपुºया मनुष्यबळाला नागरिकांची साथ हवी.- डॉ. फारुख शेख,वैद्यकीय अधिकारी, मनपा

पदभरतीला सुरुवात!जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर निश्चितच ताण येत आहे. त्यामुळे कंत्राटी तत्वावर पदभरती करण्यात आली असून, त्या माध्यमातून रुग्णसेवा सुरळीत सुरू ठेवण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करत आहे. रुग्णांना उत्तम आरोग्यसुविधा तसेच रुग्णालय परिसरात भौतिक सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.- डॉ. राजकुमार चव्हाण,जिल्हा शल्य चिकित्सक,अकोला

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय