शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण नियमानुकूलसाठी केवळ १४०५ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 14:25 IST

शुल्क घेऊन नियमानुकूल करण्यासाठी १०१८ प्रस्तावांवर कार्यवाही सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्रामीण भागातील गावठाणात केलेल्या अतिक्रमणाच्या जागांची शासकीय किंमत वसूल करून त्या जागांची मालकी संबंधितांना देण्यासाठी जिल्ह्यात केवळ १४०५ प्रस्तावच तयार झाले आहेत. त्यापैकी १०१८ प्रस्तावांनुसार संबंधितांकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जागांची ही संख्या पाहता जिल्ह्यातील हजारो लाभार्थी अद्यापही वंचित असल्याचे स्पष्ट होत आहे.रमाई आवास योजना, शबरी, पंतप्रधान आवास योजनेसाठी ग्रामीण भागातील लाभार्थींजवळ मालकीची जागा असणे बंधनकारक करण्यात आले. ज्यांच्याकडे जागा आहे, ते घरकुलासाठी अपात्र तर ते पात्र आहेत त्यांच्याकडे मालकीची जागा नाही, अशी विचित्र अवस्था ग्रामीण भागात निर्माण झाली. त्यावर उपाय म्हणून संबंधित लाभार्थींना अतिक्रमण केले असल्यास त्या जागेची शासकीय किंमत वसूल करून ती जागा लाभार्थींच्या नावे करण्याचा उपाय सुरू झाला. त्यासाठी ग्रामीण भागात गावठाणात असलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायतीमधील नमुना आठ (कर आकारणी नोंदवही)मधील माहितीनुसारच अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे ठरले. नियमानुकूल करण्यासाठी राज्यभरात ४ लाख ७३ हजार २४८ जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांची संख्या आहे. १०,०३३ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांमध्ये अतिक्रमणाचे प्रस्ताव घेण्यात आले. त्यामध्ये २, २३, ९३५ प्रकरणे आहेत. त्यापैकी आॅनलाइन झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर मंजुरी देण्यात आली. अकोला जिल्ह्यात केवळ १४०५ प्रकरणेच प्राप्त आहेत. शुल्क घेऊन नियमानुकूल करण्यासाठी १०१८ प्रस्तावांवर कार्यवाही सुरू झाली आहे. ही संख्या पाहता जिल्ह्यातील शेकडो अतिक्रमक या प्रक्रियेतून लांबच असल्याचे स्पष्ट होत आहे. सर्वात कमी संख्या अकोला तालुक्यातील असल्याचे दिसत आहे. अतिक्रमण करणाºयाने जागेची शासकीय किंमत जमा केल्यानंतरच मालकी हक्काची नोंद केली जाणार आहे. संबंधित गटविकास अधिकाऱ्यांकडून ही कार्यवाही होत आहे. त्याचवेळी प्रत्येक पंचायत समितीमधील शेकडो लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Akolaअकोला