शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन बदल्या : शिक्षकांच्या तक्रारी आयुक्तांकडून खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 12:19 IST

अकोला : शासनाने केलेल्या आॅनलाइन बदल्यांमध्ये अन्याय झाल्यामुळे अमरावती विभागातील एक हजारांपेक्षाही अधिक शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली.

ठळक मुद्देसामूहिक सुनावणी घेत त्या सर्व तक्रारी खारीज केल्याचे पत्र आयुक्तांनी सोमवारीच जिल्हा परिषदेला दिले.तक्रारकर्त्या शिक्षकांनी म्हणणे मांडले; मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

अकोला : शासनाने केलेल्या आॅनलाइन बदल्यांमध्ये अन्याय झाल्यामुळे अमरावती विभागातील एक हजारांपेक्षाही अधिक शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. त्यावर सामूहिक सुनावणी घेत त्या सर्व तक्रारी खारीज केल्याचे पत्र आयुक्तांनी सोमवारीच जिल्हा परिषदेला दिले. त्यामुळे एकल महिला, गर्भवती, स्तनदा माता, पती-पत्नी एकत्रीकरण न होता अन्याय झालेल्या महिलांचा भ्रमनिरास झाला आहे.आॅनलाइन बदल्यांमध्ये झालेल्या अन्यायाविरोधात शिक्षकांनी प्रथम विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. अमरावती विभागातील सर्व तक्रारींचा एकाच वेळी निपटारा करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल मागविला. सोबतच तक्रारींची सुनावणी करण्यासाठी जिल्ह्यातील तक्रारकर्त्या शिक्षकांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली.अकोला जिल्ह्यातील १५० पेक्षाही अधिक शिक्षकांची तीन दिवस विभागून सुनावणी घेण्यात आली. महसूल उपायुक्तांच्या कक्षात १९, २०, २१ जुलै रोजी तक्रारकर्त्या शिक्षकांनी म्हणणे मांडले; मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

प्रतिज्ञापत्रासाठी आटोपले सोपस्कार!आॅनलाइन बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याच्या याचिका राज्यातील उच्च न्यायालयात दाखल आहेत. त्यांची सुनावणीही न्यायालयात एकत्रित होत आहे. शिक्षकांच्या तक्रारीनुसार म्हणणे ऐकून घेऊन त्यानुसार न्यायालयात शासनाची बाजू मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर केले जात आहे. त्या प्रतिज्ञापत्रात शिक्षकांची बाजू ऐकून घेतली, असे स्पष्ट केले जाणार आहे. त्यासाठी ही सुनावणी घेण्यात आली; मात्र त्यातून शिक्षकांना कोणताच दिलासा मिळाला नाही. ती केवळ औपचारिकता ठरली.

 जिल्ह्यातील शेकडो शिक्षक अन्यायग्रस्तअकोला जिल्ह्यात १५० पेक्षाही अधिक शिक्षकांमध्ये अकोटमधील ३२ शिक्षकांनी एकत्रित तक्रार केली आहे. सविता तुकाराम ढाले अधिक ३२ अन्यायग्रस्त शिक्षकांची नावे त्यामध्ये आहेत, तर इतरांनी वैयक्तिक तक्रारी नोंदविल्या आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक