शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील खतांच्या ऑनलाइन विक्रीला १८0 केंद्रांत ठेंगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:02 IST

अकोला : शेतकर्‍यांना रासायनिक खतांची ऑनलाइन विक्री १ जून २0१७ पासूनच करण्याचे ठरले असताना, त्यामध्ये अपयश आल्यानंतर १ नोव्हेंबरपासून शंभर टक्के विक्री ऑनलाइन करण्याचे निर्बंध लादण्यात आले. दोन महिने उलटल्यानंतरही जिल्ह्यातील १८0 केंद्रांतून खतविक्रीचा एकही व्यवहार ऑनलाइन झाला नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेत कृषी विभागाने या काळात खतांची विक्री कशी केली, याचा अहवाल सादर करण्याची नोटीस पंचायत समित्यांच्या गुणनियंत्रण अधिकार्‍यांना दिली आहे.

ठळक मुद्देपंचायत समितीच्या गुणनियंत्रण अधिकार्‍यांना बजावली नोटीस

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकर्‍यांना रासायनिक खतांची ऑनलाइन विक्री १ जून २0१७ पासूनच करण्याचे ठरले असताना, त्यामध्ये अपयश आल्यानंतर १ नोव्हेंबरपासून शंभर टक्के विक्री ऑनलाइन करण्याचे निर्बंध लादण्यात आले. दोन महिने उलटल्यानंतरही जिल्ह्यातील १८0 केंद्रांतून खतविक्रीचा एकही व्यवहार ऑनलाइन झाला नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेत कृषी विभागाने या काळात खतांची विक्री कशी केली, याचा अहवाल सादर करण्याची नोटीस पंचायत समित्यांच्या गुणनियंत्रण अधिकार्‍यांना दिली आहे.खतांची विक्री ऑनलाइन करण्यासाठी जिल्हय़ातील कृषी केंद्रांमध्ये ४३१ पॉस (पॉइंट ऑफ सेल) मशीनची गरज होती. केंद्र शासनाने संबंधित खत उत्पादक कंपन्यांना पॉस मशीन उपलब्ध करण्याचा आदेश दिला. शासनाने १ जूनपासून मशीनद्वारे खतांची विक्री बंधनकारक केली, तरी त्या तारखेपर्यंत उत्पादक कंपन्यांनी केवळ ५0 मशीन उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यानंतर तब्बल दीड महिन्यांनंतर जुलैमध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला १00 मशीन मिळाल्या. केंद्र शासनाच्या यादीनुसार अकोला जिल्हय़ात ४३१ पॉस मशीनचा पुरवठा झुआरी डीलर्स यांच्याकडे देण्यात आला. मशीनचा पुरवठा न झाल्याने १0 ऑक्टोबर रोजी केंद्र शासनाचे अधिकारी दलबिरसिंह यांनी बैठक घेत १ नोव्हेंबरपासून खतांची ऑनलाइन विक्री बंधनकारक केली. त्यासाठी अद्ययावत मशीन पुरवठा करण्याचे निर्देशही झुआरी डीलर्स यांना दिले. त्यानुसार सर्वच केंद्रांना पॉस मशीन पुरवठा झाला. 

खतांचा काळाबाजार होण्याची शक्यताखतांचा काळाबाजार करणे, टंचाईच्या काळात ठरावीक शेतकर्‍यांनाच देणे, इतर खासगी वस्तू उत्पादनासाठी खतांची विक्री होण्याचे प्रकारही मोठय़ा प्रमाणात घडले. त्यामुळे शासनाचे अनुदान शेतकर्‍यांना दिलेल्या खतांसाठीच घेतले जाते की नाही, ही बाब पॉस मशीनद्वारे उघड होणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांच्या आधार कार्डची ऑनलाइन पडताळणी करणे, त्याच व्यक्तीने खत घेतल्याचा पुरावा म्हणून त्याचा अंगठाही घेण्यात येतो. मशीन पुरविणे, त्यामध्ये दुरूस्ती करून देणे, विक्रेत्यांना प्रशिक्षण देणे, ऑनलाइनसाठी समन्वय ठेवण्याची जबाबदारी पुरवठादार झुआरी डीलर्सची आहे. मात्र, तपासणी अहवालानुसार खत उत्पादक आणि वितरकांनी ऑनलाइनऐवजी ऑफलाइन विक्री करण्याचाच प्रयत्न केला आहे. 

पाच दिवसांत केली केंद्रांची तपासणीकृषी केंद्रांना पॉस मशीन प्राप्त झाल्याने तेथून शेतकर्‍यांना खताची विक्री ऑनलाइन करणे आवश्यक होते. मात्र, ती होत नसल्याचा प्रकार कृषी विभागाने ८ ते १२ जानेवारीदरम्यान केलेल्या तपासणीत उघड झाले. जिल्ह्यातील १८0 कृषी केंद्रात तपासणीच्या तारखेपर्यंत खतविक्रीचा एकही व्यवहार ऑनलाइन नोंद झाला नाही. या काळात संबंधितांनी खतांची विक्री कशी केली, ही बाब संशयास्पद आहे. त्यामुळे पंचायत समितीनिहाय ऑनलाइन खत विक्रीचा अहवाल निरंक असलेल्या केंद्राची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीण