शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल खरेदीच्या परवान्याला ‘ऑनलाइन’ची जोड

By admin | Updated: November 16, 2016 02:24 IST

घरबसल्यादेखील ऑनलाइनद्वारे प्रस्ताव सादर करता येणार आहे.

संतोष वानखडे वाशिम, दि. १५- शेतकर्‍यांकडून थेट शेतमाल खरेदी करण्यासाठी खासगी बाजाराचा परवाना मिळविण्याच्या प्रक्रियेला आता ह्यऑनलाइनह्णची जोड देण्यात आली आहे. इंटरनेट कॅफे किंवा घरबसल्यादेखील ऑनलाइनद्वारे प्रस्ताव सादर करता येणार आहे.शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे अधिकांश व्यवहार हे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत केले जातात. तथापि, शेतमाल खरेदी करण्यासाठी खासगी बाजार अथवा व्यक्तिश: व्यापार्‍यांना शासनाच्या पणन संचालनालयातर्फे परवाना दिला जातो. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर यापूर्वी व्यक्तिश: प्रस्ताव सादर करणे बंधनकारक होते. आता यामध्ये सुधारणा केली असून, १५ नोव्हेंबरपासून ऑनलाइनद्वारे प्रस्ताव सादर करता येणार आहे. थेट पणन, खासगी बाजार व व्यक्तिश: परवाना मिळविण्यासाठी संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. या संकेतस्थळावर 'डिरेक्टोरेट ऑफ मार्केटिंग' या पर्यायांतर्गत थेट पणन, खासगी बाजार, सिंगल लायसन यापैकी आवश्यक त्या लिंकवर जाऊन ह्यक्लिकह्ण करावी लागणार आहे. येथे आवश्यक ती माहिती अपलोड करून ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. परवाना मिळविण्यासाठी आता नव्याने ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाल्याने संबंधित व्यापारी अथवा खासगी बाजार संचालकांचा गोंधळ उडू नये म्हणून पणन संचालनालयाने ह्यमार्गदर्शन कक्षह्ण सुरू करण्याच्या सूचना सर्व जिल्हा उपनिबंधकांना दिलेल्या आहेत. त्यानुसार वाशिम येथे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक व विभाग प्रमुखांचा मोबाइल क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. या कार्यालयात व्यक्तिश: अथवा मोबाइल क्रमांकावरही शंकांचे निरसन केले जाणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.