शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

खतांची ऑनलाइन विक्री १ नोव्हेंबरपासून सक्तीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 1:42 AM

अकोला : रासायनिक खतांची ऑनलाइन विक्री १ जूनपासूनच करण्याचे ठरले असताना, जिल्हय़ात अद्यापही शंभर टक्के सुरू झालेली नाही. त्याची दखल घेत केंद्र शासनाचे अधिकारी दलबीरसिंह यांनी बैठक घेत येत्या १ नोव्हेंबरपासून खतांची ऑनलाइन विक्री बंधनकारक केली आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना आता आधार कार्ड आणि अंगठा द्यावाच लागणार आहे. 

ठळक मुद्देशेतकर्‍यांना आधार कार्ड आणि अंगठा द्यावाच लागणार!शेतकर्‍यांना आता आधार कार्ड आणि अंगठा द्यावाच लागणार

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रासायनिक खतांची ऑनलाइन विक्री १ जूनपासूनच करण्याचे ठरले असताना, जिल्हय़ात अद्यापही शंभर टक्के सुरू झालेली नाही. त्याची दखल घेत केंद्र शासनाचे अधिकारी दलबीरसिंह यांनी बैठक घेत येत्या १ नोव्हेंबरपासून खतांची ऑनलाइन विक्री बंधनकारक केली आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना आता आधार कार्ड आणि अंगठा द्यावाच लागणार आहे. खतांचा काळाबाजार करणे, टंचाईच्या काळात ठरावीक शेतकर्‍यांनाच पुरवठा होणे, या बाबीही आता पॉस मशीन थांबविणार आहे. खत खरेदीसाठी आलेल्या शेतकर्‍यांच्या आधार कार्डची ऑनलाइन पडताळणी होणार आहे, तसेच त्याच व्यक्तीने खत घेतल्याचा पुरावा म्हणून त्याचा अंगठाही घेतला जाणार आहे. खतांची विक्री ऑनलाइन करण्यासाठी जिल्हय़ातील कृषी केंद्रांमध्ये ४३१ पॉस (पॉइंट ऑफ सेल) मशीन आवश्यक आहेत. केंद्र शासनाने संबंधित खत उत्पादक कंपन्यांना पॉस मशीन उपलब्ध करण्याचे आदेश दिले. शासनाने १ जूनपासून बंधनकारक केले, तरी त्या तारखेपर्यंत उत्पादक कंपन्यांनी केवळ ५0 मशीन उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यानंतर पॉस मशीनचा पुरवठा तातडीने करावा, यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे यांनी १७ मे आणि त्यानंतरही सातत्याने पुरवठादार कंपनीला पत्र पाठविले. तब्बल दीड महिन्यानंतर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला १00 मशीन जुलैमध्ये मिळाल्या. केंद्र शासनाने आधीच यादीनुसार अकोला जिल्हय़ात ४३१ कृषी सेवा केंद्रांमध्ये पॉस मशीन दिल्या जात आहेत. त्या सर्व १५0 मशीनचे वाटप कृषी विभागाकडून झाले आहे. मशीन पुरविणे, विक्रेत्यांना प्रशिक्षण देणे, ऑनलाइनसाठी समन्वय ठेवण्याची जबाबदारी पुरवठादार झुआरी डीलर्सची आहे; मात्र आवश्यकतेएवढय़ा पॉस मशीन उपलब्धच झालेल्या नाहीत. त्यामुळे शासनाचा महत्त्वाकांक्षी असलेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी सुरुवातीलाच रखडली. आतापर्यंतच्या अहवालानुसार खत उत्पादक आणि वितरकांनी ऑनलाइनऐवजी ऑफलाइन विक्री करण्याचाच प्रयत्न केला आहे. त्यातून केंद्र शासनाकडून प्रचंड अनुदानही घेतले जाणार आहे. शासनाचे अनुदान शेतकर्‍यांना विक्री केलेल्या खतांसाठीच घेतले जात आहे की नाही, यासाठी शेतकर्‍यांची पडताळणी होणे आवश्यक आहे. याच महत्त्वाच्या मुद्यावर केंद्र शासनाचे अधिकारी दलबीरसिंह यांनी कृषी विभागाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी झुआरी डीलर्सच्या प्रतिनिधींना अद्ययावत मशीन उपलब्ध करून देण्याचे बजावले. बैठकीला जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे, राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्सचे विभागीय अधिकारी अजय नारळे यांच्यासह खत उत्पादक, वितरक, विक्रेते उपस्थित होते.