शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

आॅनलाइन धान्य वाटपात १५ तालुके माघारले; तपासणीचा अहवाल जाणार शासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 13:18 IST

अकोला : शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशीनद्वारे आॅनलाइन धान्य वाटपात अमरावती विभागातील १५ तालुके कमालीचे माघारले आहेत.

ठळक मुद्देपुरवठा विभागाने १ ते ४ सप्टेंबरदरम्यान धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्याचा एकत्रित अहवाल शासनाकडून मागवण्यात आला आहे.

अकोला : शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशीनद्वारे आॅनलाइन धान्य वाटपात अमरावती विभागातील १५ तालुके कमालीचे माघारले आहेत. इतर तालुक्यातील शंभर टक्के तुलनेत कोणत्या कारणांमुळे हा प्रकार घडत आहे, याचा शोध घेण्यासाठी पुरवठा विभागाने १ ते ४ सप्टेंबरदरम्यान धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्याचा एकत्रित अहवाल शासनाकडून मागवण्यात आला आहे.धान्याचे वाटप पॉस मशीनऐवजी मॅन्युअली करताना ते पात्र लाभार्थींना न झाल्यास संबंधित दुकानदारांवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश शासनाने आधीच दिले आहेत. मात्र, त्याबाबत चौकशीच झालेली नाही. त्यामुळे कारवाईलाही फाटा दिला जात आहे.धान्य न घेणाऱ्या लाभार्थींच्या नावे शासनाकडून उचल केली जाते; मात्र लाभार्थींना वाटप होत नाही. त्यातून होणारा धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने ‘एई-पीडीएस’ प्रणाली सुरू केली; मात्र पॉस मशीनद्वारे वाटप करण्यासाठी माहिती न जुळणे, लाभार्थींचे आधार कार्ड लिंक नसणे, यामुळे ग्रामीण भागात ७० ते ८०, तर शहरी भागात ६० ते ७० टक्केच वाटप एई-पीडीएस प्रणालीतून होत आहे. उर्वरित लाभार्थींना मॅन्युअली वाटप होत आहे. मॅन्युअली वाटप होत असलेले धान्य पात्र लाभार्थींनाच दिले जाते की नाही, त्यांच्या नावे भलत्याच व्यक्तींची नावे दाखवून त्याचा काळाबाजार होत असल्याचा प्रकारही घडत आहे.- चार दिवस तपासणी मोहीमपुरवठा विभागाच्या सहसचिवांनी दिलेल्या आदेशानुसार १ ते ४ सप्टेंबरदरम्यान तपासणी सुरू करण्यात आली. त्यामध्ये अमरावती विभागातील दर्यापूर, वरुड, अंजनगाव सुर्जी, अकोला ग्रामीण, अकोला शहर, अकोट, कारंजा, मानोरा, वाशिम, पुसद, यवतमाळ, बाभुळगाव, लोणार, मेहकर, खामगाव या तालुक्यांचा समावेश आहे. आयुक्तांमार्फत अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे.- मॅन्युअली वाटप पूर्णत: बंदचे निर्देशविशेष म्हणजे, शासनानेच लाभार्थींना होणारे मॅन्युअली वाटप पूर्णत: बंद करण्याचा आदेश दिला आहे. सर्वत्र हा प्रकार सुरू आहे. पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचारी त्याकडे कानाडोळा करीत आहेत. हा प्रकार बंद होण्यासाठी १५ तालुक्यांत धडक तपासणी सुरू करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAmravatiअमरावती