शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य विभागातर्फे ऑनलाईन रोजगार मेळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:24 IST

या मेळाव्‍यात नामवंत कंपनीतील विविध पदाकरिता ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविली जाईल. दहावी, बारावी, पदवीधर आय.टी.आय. उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता धारक ...

या मेळाव्‍यात नामवंत कंपनीतील विविध पदाकरिता ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविली जाईल. दहावी, बारावी, पदवीधर आय.टी.आय. उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांना संधी उपलब्‍ध असेल. इच्छुकांनी या रोजगार मेळाव्‍यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्‍त प्रांजली यो. बारस्‍कर यांनी केले आहे

भरतीया रूग्णालयात नागरिकांची स्वॅब तपासणी

अकोला- काेराेनाच्या वाढत्या उद्रेकामुळे रूग्ण शाेध माेहीम राबविली जात असून महापालिकेच्या भरतीया रूग्णालयात नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यास सुरवात झाली आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रभाकर मृदगल यांच्या नेतृत्वातील चमू कार्यरत आहे

महसूल मंडळ अधिकाऱ्याची चाैकशी करा

अकोला- बार्शीटाकळी येथील महसूल मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पारस्कर यांच्या दप्तराची चाैकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनुराध ठाकरे व सहकाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

सिंधी काॅलनीत जनजागृती

अकाेला: शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाही मास्क न लावणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियम पाळावे असे आवाहन समाजसेवक मनाेहर पंजवाणी यांनी केले असून त्यांनी सिधी काॅलनीत काेराेनाबाबत जनजागृती केली.

प्रवाशांची गर्दी कायमच

अकाेला: शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने लाॅकडाऊन घाेषित केले आहे मात्र या दरम्यानही प्रवाशांची संख्या वाढतीच असून बसस्थानकावर गर्दी हाेत असल्याचे चित्र गुरूवारी दिसून आले. बसमध्ये चढताना प्रवाशांमध्ये शिस्त नसल्याने फिजिकल डिस्टन्सिंगला खाे दिला जात आहे.

फळांची मागणी वाढली

अकाेला: शहरात लाॅकडाऊनमुळे दुपारी तीन वाजेपर्यंतच जीवनाश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या दरम्यान नागिरकांकडून माेठ्या प्रमाणात फळे खरेदी करण्यास पसंती दिली जात असल्याचे समाेर आले आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असून टरबुजांची विक्री आतापासूनच वाढल्याचे दिसत आहे.

झिंगराजी महाराज यात्रा महाेत्सव रद्द

अकाेला- म्हस्केवाडी येथील झिंगराजी महाराज यात्रा महाेत्सव २७ फेब्रुवारी राेजी हाेता. मात्र काेराेनाच्या वाढत्या प्रसारामुळे हा महाेत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष अशाेक वामन म्हस्के यांनी प्रसिद्धीस दिली आहे. मंंदिर परिसरातच विधीवत पूजा करून हा महाेत्सव काेराेना नियमातच साजरा केला जाणार आहे.