शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाइन’ अर्जासाठी प्रशासनाचा आटापिटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:27 IST

महिनाभरात केवळ एक हजार शेतक-यांचे भरले अर्ज

संतोष येलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकºयांचे ‘आॅनलाइन’ अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत गत  महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ दहा हजार सहा शेतकºयांचे अर्ज भरण्यात आले.आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत केवळ २० दिवसांवर आली असताना, जिल्ह्यातील थकबाकीदार  शेतकºयांचे कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने आटापिटा सुरू केला आहे.सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकºयांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकºयांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.  त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकºयांचे ‘आॅनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतथळावर भरून घेण्याची प्रक्रिया गत २४ जुलैपासून जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) व आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर सुरू करण्यात आली आहे.जिल्ह्यात एकूण ७१ हजार ३७९ थकबाकीदार शेतकरी असून, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १४ हजार २७२ आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या ५७ हजार १०७ थकबाकीदार शेतकºयांचा  समावेश आहे. गत महिनाभराच्या कालावधीत २४ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांपैकी केवळ १० हजार ६ थकबाकीदार शेतकºयांचे कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात आलेअसून, जिल्ह्यातील उर्वरित थकबाकीदार शेतकºयांचे आॅनलाइन अर्ज भरणे बाकी आहेत. कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. त्यानुसार शेतकºयांचे आॅनलाइन  अर्ज भरण्यास केवळ २० दिवसांचा कालावधी उरला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांचे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी, आता जिल्हा प्रशासनामार्फत आटापिटा सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार प्रामुख्याने सुटीच्या दिवशीही सेतू केंद्र सुरू ठेवून, कर्जमाफीचे शेतकºयांचे आॅनलाइन अर्ज भरणे, आॅनलाइन अर्ज भरण्यात येणाºया अडचणी दूर करणे, आॅनलाइन अर्ज भरताना शेतकºयांचा अंगठा घेण्यासाठी बायोमेट्रिक मशीन सेतू केंद्रांना वितरित करणे, तहसील कार्यालयांमध्ये अतिरिक्त संगणक संच बसवून कर्जमाफीचे अर्ज भरणे इत्यादी उपाययोजना करण्यात येत आहेत.मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आली गती!कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकºयांचे आॅनलाइन अर्ज भरण्याचे काम १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ आॅगस्ट रोजी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे जिल्हाधिकाºयांना दिला. त्यानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांचे कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्याचे काम जलद गतीने करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी २५ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातीलतहसीलदारांना दिला. त्यामुळे कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्याच्या कामाला गती आली आहे.देखरेख करण्यासाठी कर्मचारी नियुक्त कराजिल्हाधिकाºयांचा तहसीलदारांना आदेश!शेतकºयांचे कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी तहसील कार्यालयातील एक कर्मचारी नियुक्त करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिला आहे. तसेच अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची होणारी गर्दी बघता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देशहीजिल्हाधिकाºयांनी दिले.अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यावर प्रश्नचिन्ह!थकबाकीदार शेतकºयांचे कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्यास २० दिवसांचा कालावधी उरला आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतील संथ गती लक्षात घेता, अर्ज भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आटापिटा सुरू केला असला, तरी २० दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ६१ हजार ३७३ थकबाकीदार शेतकºयांचे कर्जमाफीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आॅनलाइन अर्ज भरण्यात अनंत अडचणी!आॅनलाइन अर्ज भरताना वारंवार ‘सर्व्हर डाउन’ होणे, नेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, ‘आपले सरकार’ वेबसाइट वारंवार बंद पडणे, अशा अनेक कारणांमुळे शेतकºयांचे कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात अनंत अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी प्रतीक्षा करणाºया अनेक शेतकºयांना अर्ज न भरताच घरी परतावे लागत आहे.