शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे आॅनलाइन प्रवेशपत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 12:46 IST

अकोला: इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) राज्य शिक्षण मंडळाने आॅनलाइन उपलब्ध केले आहे.

अकोला: इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) राज्य शिक्षण मंडळाने आॅनलाइन उपलब्ध केले आहे. शाळेतून विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेशपत्र देण्यात येत आहेत. २९ जानेवारीपासून प्रवेशपत्रांचे वितरण सुरू झाले असून, ही प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून द्यावी, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारू नये, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.माध्यमिक (दहावी)ची परीक्षा १ मार्च ते २२ मार्चदरम्यान होणार आहे, तर उच्च माध्यमिक (बारावी)ची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २0 मार्च दरम्यान होणार आहे. अमरावती विभागामध्ये दहावीच्या परीक्षेला एकूण १ लाख ७२ हजार विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. दोन्ही परीक्षांसाठी जिल्ह्यातून अंदाजे ५६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यानुसार विभागीय शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना आॅनलाइन हॉलतिकीट उपलब्ध करून दिले आहेत. शाळांना देण्यात आलेल्या लॉग-इन आयडी व पासवर्डच्या आधारे शाळा हॉलतिकीट डाउनलोड करू शकतील. शाळांनी इयत्ता दहावी परीक्षेची आॅनलाइन हॉलतिकिटाची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यावी, प्रिंटिंगसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेता येणार नाही, असेही मंडळाने बजावले आहे. शाळेने विद्यार्थ्यांना हॉलतिकिटाची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करावे, विद्यार्थ्यांकडून हॉलतिकीट गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करून द्यावे, हॉलतिकिटावर छायाचित्र चुकीचे असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी आणि ते विद्यार्थ्यांना द्यावे, अशा सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणexamपरीक्षा