शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आवक नसल्याने कांद्याचे भाव वधारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:46 IST

अकोला : जिल्हा परिसरातील कांदा संपल्याने आणि बाहेरून येणार्‍या कांद्याची आवक घटल्याने अकोल्यात गेल्या आठवड्यापासून कांद्याचे भाव वधारले आहेत. सातशे-आठशे रुपये क्विंटलचा कांदा अकोल्यात दोन हजार  ते पंचवीसशे रुपये क्विंटलच्या दराने विकला जात आहे. दोन महिन्याआधी अकोल्यात बेभाव मिळणारा कांदा अचानक वधारल्याने सर्वसामान्यांची भाजी महागली आहे.

ठळक मुद्दे२५00 रुपये क्विंटल दराने विकला जातोय कांदा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिसरातील कांदा संपल्याने आणि बाहेरून येणार्‍या कांद्याची आवक घटल्याने अकोल्यात गेल्या आठवड्यापासून कांद्याचे भाव वधारले आहेत. सातशे-आठशे रुपये क्विंटलचा कांदा अकोल्यात दोन हजार  ते पंचवीसशे रुपये क्विंटलच्या दराने विकला जात आहे. दोन महिन्याआधी अकोल्यात बेभाव मिळणारा कांदा अचानक वधारल्याने सर्वसामान्यांची भाजी महागली आहे. अकोला जिल्ह्यात आणि सीमावर्तीय भागात मोठय़ा प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. मात्र, तरीही अकोल्याला हा कांदा पुरेसा नसतो. त्यामुळे जूननंतर अकोला परिसरात नाशिक, लासलगाव येथून कांदा मोठय़ा प्रमाणात येत असतो. दरवर्षी याच कार्यकाळात लासलगावचा कांदा येतो. मात्र, नाशिक परिसरात आलेल्या पुरामुळे यंदा लासलगावचा कांदाही अपुरा पडतो आहे. कारण लासलगावचा कांदा राज्यातच नव्हे, तर देश आणि आशिया खंडात सर्वत्र पोहोचतो. मात्र, यंदाची स्थिती काही निश्‍चित नाही. त्यामुळे अकोला पोहोचविला जाणारा कांदाही महाग झाला आहे. जो कांदा कधीकाळी सातशे ते हजार रुपये क्विंटल होता, तोच कांदा आता दोन हजार ते पंचवीसशे रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. कांद्याचे भाव कडाडल्याने आता सर्वसामान्य माणसाच्या घरातील किचनचे बजेट बिघडले आहे. कारण दररोजच्या वापरात असलेला कांदा महागल्याने नागरिकांच्या डोळ्य़ात पाणी आले आहे. वधारलेल्या भावाने कांद्याला चांगले दिवस आले असले, तरी यातील किती पैसा कास्तकारांच्या घरात जातो, हा मात्र संशोधनाचा विषय ठरतो आहे.

कांद्याचे भाव गेल्या आठ दिवसांपासून वधारले असले, तरी ही स्थिती स्थिर राहणारी नाही. लासलगावचा कांदा येतो आहे. सोबतच राज्याबाहेरूनही कांदा येण्यास सुरुवात झाली की पुन्हा काद्यांचे भाव कमी होतील.-नीलेश पवित्रकार, काद्यांचे ठोक व्यावसायी, अकोला.