शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

दिवसभरात एकाचा बळी; ८२ पॉझिटिव्ह,२८ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 20:02 IST

पातूर तालुक्यातील आलेगाव येथील वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १४८ वर गेला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, शुक्रवार, २८ आॅगस्ट रोजी पातूर तालुक्यातील आलेगाव येथील वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १४८ वर गेला आहे. दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४७, नागपूर येथील खासगी प्रयोगशाळेचे २५ व रॅपिड चाचण्यांमध्ये १० असे एकूण ८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३,७७५ वर पोहचली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शुक्रवारी सकाळी २५० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, २०३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. यामध्ये मुर्तीजापूर शहरातील १५, डाबकी रोड अकोला येथील चार, तेल्हारा येथील तीन, जुने शहर येथील दोन, किर्ती नगर येथील दोन, अकोट येथील दोन, बाजोरीया हाऊस येथील दोन, मुर्तीजापूर तालुक्यातील सांजापूर, तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार, पातूर तालुक्यातील गावंडगाव, सिंधी कॅम्प , मलकापूर, मराठा नगर, पातूर तालुक्यातील पिंपळखुटा, महादेव नगर, म्हैसांग, रामदास पेठ, हिंगणा फाटा , हरिहर पेठ , पंचशील नगर, आगर, हिवरखेड व अकोट फैल येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

आलेगाव येथील महिलेचा मृत्यूशुक्रवारी पातूर तालुक्यातील आलेगाव येथीला ७३ वर्षीय महिला रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू झाला. या महिलेस २२ आॅगस्ट रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

खासगी प्रयोगशाळेचे २५ अहवाल पॉझिटिव्हडॉ. हेडगेवार हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत घेण्यात आलेले नमुणे तपासणीसाठी नागपूर येथील खासगी प्र्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यामध्ये २५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. 

रॅपिड चाचण्यांमध्ये १० पॉझिटिव्हशुक्रवारी दिवसभरात झालेल्या १९८ रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये १० जण पॉझिटिव्ह आढळून आले. अकोला मनपा क्षेत्रात सात, आयएमएच्या कॅम्पमध्ये एक, तर वैद्यकीय कर्मचाºयांपैकी एक असे एकूण १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत १२२७१ चाचण्यांमध्ये ६९३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

२८ जणांना डिस्चार्जदुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २३, ओझोन हॉस्पिटल येथून दोन तर हॉटेल रिजेन्सी येथून तीन जणांना अशा एकूण २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

५०९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३,७७५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३११८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५०९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला