शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देशी बीटी कपाशीचे एका एकरातील उत्पादन पोहोचले ८.४ क्विंटलवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 13:17 IST

अकोला : देशातील पहिल्या बीटी कापसाची वेचणी आता शेवटच्या टप्प्यात असून, आतापर्यंत एका एकरात आतापर्यंत ८.४ क्ंिवटल एवढा उतारा आला आहे.

ठळक मुद्देडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर चाचणी घेण्यात येत आहे.१२ क्विंटल उत्पादनाची शक्यता

- राजरत्न सिरसाट

अकोला : देशातील पहिल्या बीटी कापसाची वेचणी आता शेवटच्या टप्प्यात असून, आतापर्यंत एका एकरात आतापर्यंत ८.४ क्ंिवटल एवढा उतारा आला आहे. आणखी या कापसाच्या झाडांपासून चार ते पाच क्ंिवटल कापूस अपेक्षित असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. बीटीचे हे देशी वाण विकसित केल्यानंतर प्रथमच यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर चाचणी घेण्यात येत आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व एका खासगी कंपनीने मिळून हे संशोधन पूर्ण केले आहे. कृषी विद्यापीठांनी निर्मित केलेल्या पीडीकेव्ही-जेकेएल ११६ कपाशीच्या वाणांमध्ये बीजी-२ चे जीन्स टाकून नवे वाण विकसित करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अकोल्यात मध्यवर्ती संशोधन केंद्र आहे. या केंद्रांतर्गत असलेल्या पश्चिम विभागाच्या प्रक्षेत्रावर चाचणीसाठी या बियाण्याची जून महिन्यात पेरणी करण्यात आली होती. कपाशीच्या या झाडांना भरघोस कापूस आला आहे; पण पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम यावर्षी झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यावर्षी पाणीच उपलब्ध नसल्याने जेमतेम पाण्यावर ही चाचणी घेण्यात आली असून, आतापर्यंतच्या एका एकरात दोन वेचण्या पूर्ण झाल्या असून, ८.४ क्ंिवटल उत्पादन झाले आहे. आणखी चार ते पाच क्ंिवटल कापूस होणार असल्याचे कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नियमित वेचणीसह फरदडचा कापूसही निघण्याची शक्यता आहे. एक एकर क्षेत्रावर बीटी कापसाची चाचणी!मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या पश्चिम विभागाच्या क्षेत्रावर एक एकर क्षेत्रावर बीटी कपाशीची चाचणी घेतली जात आहे. यामध्ये कोरडवाहू आणि ओलीत अशा दोन प्रकारच्या बीटी कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. एकरी १२ क्ंिवटल उत्पादन म्हटले, तरी हे चांगले उत्पादन मानले जात आहे. वेळेवर पाऊस आला असता, तर हे उत्पादन अधिक झाले असते, असा दावाही कृषी शास्त्रज्ञांनी केला.

 आतापर्यंत जिराईत व ओलिताच्या एका एकर क्षेत्रात ८.४ क्ंिवटल देशी बीटी कापसाचे उत्पादन झाले आहे. आणखी चार ते पाच क्ंिवटल उत्पादन होईल. पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम झाला आहे, अन्यथा १५ क्ंिवटलच्यावर उत्पादनाची शक्यता होती.- शंकरराव देशमुख,विभाग प्रमुख,पश्चिम संशोधन प्रक्षेत्र,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkola cityअकोला शहर