शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख शेतकऱ्यांचे खाते क्रमांक आधार ‘लिंक’विना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 10:52 IST

नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी १ लाख ६ हजार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक व मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) नाहीत.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: प्रधानमंत्री किसान (पीएम-किसान) सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात नोंदणी करण्यात आलेल्या पात्र १ लाख ७५ हजार ५८३ शेतकऱ्यांपैकी १ लाख ६ हजार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आणि मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) नाहीत. त्यामुळे योजनेंतर्गत प्रतिवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी गुरुवारी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिला.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकºयांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये (दोन हजार रुपये हप्त्याप्रमाणे) वितरित करण्याची योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने ‘पीएम-किसान’ सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात गत सप्टेंबर अखेरपर्यंत १ लाख ७५ हजार ५८३ शेतकºयांची नोंदणी करण्यात आली असून, नोंदणी केलेल्या शेतकºयांची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत शासनाच्या ‘पीएम-किसान’ पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आली; परंतु नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी १ लाख ६ हजार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक व मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) नाहीत. आधार क्रमांक ‘लिंक’ नसल्याने ‘पीएम-किसान’ सन्मान निधी योजनेंतर्गत प्रतिवर्ष सहा हजार रुपयांची रक्कम मिळण्यास अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी आधार क्रमांक ‘लिंक’ नसलेल्या शेतकºयांचे बँक खाते क्रमांक व मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे निर्देश कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी २८ नोव्हेंबर रोजी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे जिल्हाधिकाºयांना दिले. त्यानुषंगाने ‘पीएम-किसान’ सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांचे बँक खाते क्रमांक व मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिला आहे.‘सीएससी’मार्फत आधार ‘लिंक’ करण्याचे निर्देश!‘पीएम-किसान’ सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ६ हजार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक व मोबाइल क्रमांकाशी आधार क्रमांक ‘लिंक’ करण्याचे काम सामान्य सेवा केंद्रांमार्फत (सीएससी) करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील तहसीलदार आणि ‘महाआॅनलाइन’च्या जिल्हा समन्वयकांना दिले. त्यानुसार शेतकºयांचे आधार क्रमांक ‘लिंक’ करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना