शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

दुचाकीच्या अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 10:30 IST

घटनेत दुचाकीस्वार किरण पवार याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या शेख. अब्दुल्ला हा गंभीर जखमी झाला.

अकोला : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली. घटनेत दुचाकीस्वार किरण पवार याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या शेख. अब्दुल्ला हा गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील अशोक लेलँडजवळ घडली.शिवसेना वसाहत स्थित बजरंग चौक येथील रहिवासी किरण रमेश पवार (१९) आणि पोळा चौकातील कल्याणवाडी येथील रहिवासी शेख अब्दुला अब्दुल सत्तार हे दोघे एका हार्डवेअरच्या दुकानात काम करतात. रविवारी दुकान मालकाच्या कुटुंबातील लग्नासाठी ते एम.एच. ३० ए.एल. ६३३५ क्रमांकाच्या दुचाकीने हॉटेल जलसासाठी निघाले होते; परंतु राष्ट्रीय महामार्गावरील अशोक लेलँडजवळ किरणचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी दुभाजकावर जाऊन आदळली. घटनेत किरण पवार याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर शेख अब्दुल्ला हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गंभीर जखमीला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दुतर्फा वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळपास ३० मिनिटांच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात