कारंजा लाड (जि. वाशिम): नागपुर येथून औरगांबाद कडे भरधाव वेगाने जाणार्या कारची झाडाला धडक लागून घडलेल्या अपघातात एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना १0 जुलै रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास कारंजा तालुक्यातील खेर्डा-कारंजा मार्गावर घडली. एम एच ३९ जे २१६८ या क्रमांकाची कार कारंजा माग्रे औरगांबादकडे जात असताना खेर्डा कारंजा गावानजिक कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही कार थेट रस्त्याच्याकडेला असलेल्या निबांच्या झाडावर आदळली. या अपघातात नंदूरबार जिल्ह्यातील शाहदा येथील बाबूलाल पाटील (५८) यांचा घटास्थळीच मृत्यू झाला, तर ईतर दोन जण जखमी झाले. जखमींना अमरावती येथे उपचारासाठीा पाठविण्यात आले.
कार अपघातात एक ठार, दोन जखमी
By admin | Updated: July 12, 2016 00:52 IST