शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत श्वास गुदमरल्याने एकाचा मृत्यू, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 02:22 IST

मूर्तिजापूर(अकोला) : येथील एका सार्वजनिक विहिरीमधील गाळ उपसण्याचे काम १३ मार्च रोजी सुरू असताना विहिरीत श्वास गुदमरल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुस-या इसमाची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यामुळे त्याच्यावर प्रथमोपचार करून अकोल्यास हलविण्यात आले.

ठळक मुद्देविहिरीतील गाळ उपसताना घडली दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर(अकोला) : येथील एका सार्वजनिक विहिरीमधील गाळ उपसण्याचे काम १३ मार्च रोजी सुरू असताना विहिरीत श्वास गुदमरल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुस-या इसमाची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यामुळे त्याच्यावर प्रथमोपचार करून अकोल्यास हलविण्यात आले. अशा एका विहिरीमधील गाळ उपसताना विहिरीत श्वास गुदमरल्याने एकाचा मुत्यूु झाला तर एक इसम अत्यवस्थ असल्याची घटना १३ मार्च रोजी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर शहरात असलेल्या सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसण्याचे काम लोकवर्गणीतून सुरू होते. शहरात उन्हाळा लागताच पिण््याच््या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकवर्गणीतून शहरातील सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढण्याचे काम लोक करीत आहेत. अशाचप्रकारे १३ मार्च रोजी शहरातील आठवडी बाजारातील हनुमान व्यायाम शाळेमागील विहिरीतील गाळ लोकवर्गणीतून क्रेनच्या सहाय्याने काढण्याचे काम सुरू होते. यावेळी धोत्रा शिंदे येथील काही मजूर विहिरीतील गाळ काढण्याचे काम करीत होते. या दरम्यान मूर्तिजापूरजवळील धोत्रा शिंदे येथील रहिवासी असलेल्या शेख इस्माइल शेख इब्राहिम (३५) यांचा श्वास गुदमरल्याने तो अचानक खाली पडला. त्यानंतर त्याच्यासोबत विहिरीत काम करीत असलेल्या धोत्रा शिंदे येथील राहुल लोखंडे (४५) यालाही अस्वस्थ वाटू लागले.  त्या दोघांनाही तातडीने वर काढून स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख सामान्य उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉकटरांनी शेख इस्माइल याला मृत  घोषित केले. राहुल लोखंडेवर प्रथमोपचार करून त्याला तातडीने अकोला येथे हलविण्यात आले. त्याची प्रकृती हे वृत्त लिहिपर्यंत अत्यवस्थ असल्याची माहिती मिळाली आहे.  विहिरीच्या वर असणाºया इसमांनी दोघांना वर काढून ल.दे.सा.रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती  मिळताच समाजसेवक नासिरोद्दीन बद्रोद्दीन यांनी तसेच काही नगरसेवकांनी रुग्णालयात धाव घेऊन गंभीर असलेल्या राहुल लोखंडेला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. याप्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी शेख इस्माइल शेख इब्राहीम यांच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Akolaअकोला