अकोला - खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिंग रोडवर कौलखेड परिसरात कारच्या भीषण अपघातात एक जण जागेवर ठार झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून, चालक फरार झाला आहे.मलकापूर परिसरातील व्हीएचबी कॉलनी येथील रहिवासी दिगंबर संतसेवा पाटील 40, शाम श्रीकृष्ण घावट व हर्षल पतींगे हे तिघे जण तुकाराम चौकाकडून रिंग रोड मार्गाने कौलखेड चौककडे शनिवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास एम एच 16 एबी 713 क्रमांकाच्या ओमनी करणे जात असताना मध्यधुंद अवस्थेत असलेल्या मयूर देशमुख रा. मलकापूर याने कार भरधाव चालविली, कारवरील नियंत्रण सुटल्याने या कारणे विधुत खांब, शिव उध्यान च्या फलकला जबर धडक दिली, या अपघातानंतर कर पलटी झाल्याने यामध्ये डीगांबर संतसेवा पाटील यांचा जागेवर मृत्यू झाला, तर हर्षल सुभाष पतींगे आणि शाम श्रीकृष्ण घावट हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामधील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अपघातानंतर चालक मयूर देशमुख फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी हर्षल पतींगे यांनी खदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कार चालक मयूर देशमुख यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 279, 337, 338, 304 तसेच मोटर vechical ऍक्ट 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संतोष महल्ले करीत आहेत.
कारच्या भीषण अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 13:19 IST
अकोला - खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिंग रोडवर कौलखेड परिसरात कारच्या भीषण अपघातात एक जण जागेवर ठार झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून, चालक फरार झाला आहे.मलकापूर परिसरातील व्हीएचबी कॉलनी येथील रहिवासी दिगंबर संतसेवा पाटील 40, शाम श्रीकृष्ण घावट व हर्षल पतींगे हे तिघे ...
कारच्या भीषण अपघातात एक ठार
ठळक मुद्देदोन जण जखमी, चालक फरार