शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तीन ट्रॅक्टरसह एक जेसीबी जप्त!

By admin | Updated: March 29, 2016 02:27 IST

कृषी विद्यापीठाच्या वणीरंभापूर प्रक्षेत्रात शेततळ्याचे अवैध उत्खनन; मुरुमाची अवैध वाहतूक.

अकोला/वणीरंभापूर: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वणीरंभापूर प्रक्षेत्रात शेततळ्याचे अवैध उत्खनन आणि मुरुमाची अवैध वाहतूक करणार्‍या तीन ट्रॅक्टरसह एक जेसीबी जप्त करण्यात आली. जप्त केलेला २५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल बोरगावमंजू पोलीस ठाण्यात जमा करण्याची कारवाई सोमवारी अकोला तहसीलदारांच्या पथकाने केली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वणीरंभापूर प्रक्षेत्रावर १0 बाय ३0 मीटर शेततळ्याचे खोदकाम करण्यात येत असून, खोदकामातील मुरूम प्रक्षेत्रातील भागात रस्ते कामांसाठी वापरण्यात येत असल्याची तक्रार अकोला तहसील कार्यालयाला प्राप्त झाली. त्यानुसार अकोल्याचे तहसीलदार राजेश्‍वर हांडे यांच्या नेतृत्वातील पथकाने कृषी विद्यापीठाच्या वणीरंभापूर प्रक्षेत्रावर जाऊन शेततळ्याच्या कामाची पाहणी केली. तपासणीदरम्यान, या शेततळ्याच्या कामासाठी निविदा काढण्यात आली नसून, अंदाजपत्रक तयार न करता, खोदकाम व उत्खननाची परवानगी घेण्यात आली नाही. तसेच शेततळ्याच्या खोदकामातील मुरूम वणीरंभापूर प्रक्षेत्रातील भागातच रस्ते कामांसाठी वापरण्यात येत असून, त्यासाठी मुरूमाची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याचे आवढळून आले. त्यामुळे कृषी विद्यापीठाच्या वणीरंभापूर प्रक्षेत्रात शेततळ्याचे अवैध उत्खनन करून मुरुमाची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याने, एमएच ३0 जे-९७३१, एमएच ३0 जे-६९३५ व एमएच जे ३१७६ या क्रमांकांचे तीन टॅक्ट्रर व एक जेसीबी असा अंदाजे २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल करण्यात आला. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल बोरगावमंजू पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. जप्त करण्यात आलेले तीन ट्रॅक्टरसह एक जेसीबी कृषी विद्यापीठामार्फत शेततळ्याच्या खोदकामासाठी व मुरूम वाहतुकीसाठी भाड्याने लावण्यात आले होते. ही कारवाई अकोल्याचे तहसीलदार राजेश्‍वर हांडे यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी सुनील देशमुख, वणीरंभापूरचे तलाठी नितीन शिंदे, महेंद्र कदम, बबनराव थिटे यांनी केली.दरम्यान तसहसीलदार राजेश्‍वर हांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कृषी विद्यापीठातील शेततळ्याच्या कामाचे अंदाजपत्रक नाही, उत्खननाची परवानगी नाही, निविदा काढण्यात आली नसल्याचे सांगीतले. अवैध उत्खनन करणारी एक जेसीबी आणि उत्खननातील मुरुमाची अवैध वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर असा अंदाजे २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून, बोरगावमंजू पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले.