शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात एकाचा मृत्यू; ९७ नवे पॉझिटिव्ह, ४० जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 18:58 IST

आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ९७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६५३२ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, रविवार २० सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील आणखी एक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा २०९ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ९७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६५३२ झाली आहे. दरम्यान, रविवारी आणखी ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २९९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९७ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २०२ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील २१ जणांसह वाडेकर लेआऊट येथील सहा, जीएमसी व जुने शहर येथील प्रत्येकी चार, मोठी उमरी व चांन्नी ता. पातुर येथील प्रत्येकी तीन, पातुर येथील दोन, सुधीर कॉलनी, आनंद नगर,शास्त्री नगर, अकोट, गीता नगर, हिवरखेड, खदान, अकोला शहर, जठारपेठ, जामठी, सिरसो, बालाजी नगर, घुसर, सुयोग कॉलनी व तापडीया नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. आज सायंकाळी पॉझिटीव्ह निदान झालेल्यांमध्ये जीएमसी येथील सात, अकोट येथील पाच, बालाजी नगर, अकोट फैल व सिव्हील लाईन येथील प्रत्येकी दोन, कृषी नगर, चांदूर, डाबकी रोड, मुर्तिजापूर, रणपिसे नगर, गंगा नगर, जीएमसी हॉस्टेल, पिंजर, बाळापूर, खडकी, चांदणी, रामनगर, कौलखेड, पातूर, चोहट्टा बाजार, दहिहांडा, हरिहरपेठ, भांबेरी ता.तेल्हारा, सार्थी, मोठी उमरी व सिरसोली ता. तेल्हारा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.कुरुम येथील महिलेचा मृत्यूरविवारी मुर्तीजापूर तालुक्यातील कुरुम येथील ५३ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना १७ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.४० जणांना डिस्चार्जरविवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.१५९१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६५३२ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४७३२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २०९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १५९१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या