शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात एकाचा मृत्यू; ३५ नवे पॉझिटिव्ह, ३० जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 18:54 IST

सोमवार, २७ जुलै रोजी अकोला शहरातील एका महिलेचा मृत्यू झाला, तर ३५ नवे पॉझिटिव्ह आढळून आले.

अकोला : कोरोनाचा कहर थांबण्याची काहीच चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवार, २७ जुलै रोजी अकोला शहरातील एका महिलेचा मृत्यू झाला, तर ३५ नवे पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा १०२ झाला असून, एकूण रुग्णसंख्या २४४८ वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे ४९६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४६१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या २५ जणांमध्ये १४ महिला व ११ पुरुषांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये चार जण हे तेल्हारा तालुक्यातील राणेगाव, चार जण हिवरखेड, चार जण पळसो-बढे, तीन जण बोरगाव मंजू, दोन जण अकोला शहरातील खदान भागातील, दोन जण नित्यानंद नगर, दोन जण जुने शहरातील, तर उर्वरित प्रत्येकी एक जण शिवणी, शंकरनगर, तारफैल व निपाना-कोठारी येथील असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. सायंकाळी १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व पाच पुरुष आहेत. यामध्ये रामनगर अकोला येथील चार जण, राणेगाव तेल्हारा येथील दोन जण तर उर्वरित हिवरखेड, बाळापूर, पातूर व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.४० वर्षीय महिला दगावलीकोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरुच असून, रविवार, २६ जुलै रोजी रात्री उशिरा एका ४० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला खैर मोहम्मद प्लॉट भागातील असून, त्यांना १८ जुलै रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

३० जणांना डिस्चार्जसोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून १० जण, कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन जणांना तर हॉटेल रेजेन्सी येथून सात जणांना अशा एकूण ३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

३३६ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत २४४८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २०१० जणांनी कारोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ३३६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या