शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 दिवसभरात एकाचा मृत्यू; २० नवे पॉझिटिव्ह, १९० जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 18:08 IST

CoronaVirus in Akola २० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७७९२ झाली आहे.

अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी मृत्यूचे सत्र मात्र सुरुच आहे. शनिवार, १० आॅक्टाबर रोजी शहरातील आणखी एक कोरोनाबाधित महिला रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५४ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७७९२ झाली आहे. दरम्यान, १९० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १७२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मूर्तिजापूर व टॉवर चौक येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प, आलेगाव ता. पातूर, जठारपेठ, वर्धमान नगर, खंडाळा बाळापूर, बोरगाव मंजू, रवी नगर, आरटीओ आॅफिस जवळ, पिंपळखुटा, वाशिम बायपास, खडकी व हनुमान वस्ती येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी अकोला शहरातील तुकाराम चौक व अनसुया नगर, शिवर येथील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.५५ वर्षीय महिलेचा मृत्यूशनिवारी आणखी एका मृत्यूची नोंद झाली. ही ५५ वर्षीय महिला देवीकर आखाडा, जठारपेठ भागातील असून, त्यांना ९ आॅक्टोबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.५६८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,७९२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६९७० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २५४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५६८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.१९० जणांना डिस्चार्जशनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १३, कोविड केअर सेंटर अकोला येथून पाच, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून सहा, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून तीन, युनिक हॉस्पीटल येथून दोन, अकोला अ‍ॅक्सीडेंट क्लिनिक येथून दोन, आयुर्वेदिक महाविद्यालय येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून एक , हॉटेल स्कायलार्क येथील नऊ व होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले १४५ अशा एकूण १९० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला