शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

  दिवसभरात एकाचा मृत्यू; १२ नवे पॉझिटिव्ह, १४ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 18:53 IST

रविवार, २६ जुलै रोजी अकोला शहरातील एकाचा मृत्यू झाला, तर १२ नवे पॉझिटिव्ह आढळून आले.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकुळ सुरुच असून, या आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, २६ जुलै रोजी अकोला शहरातील एकाचा मृत्यू झाला, तर १२ नवे पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा १०१ झाला असून, एकूण रुग्णसंख्या २४१२ वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी दिवसभरात ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे ३३७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३२५ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये चार महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये सय्यदपुरा पातूर येथील तीन जण, दिवाली मैदान पातूर येथील दोन जण, तर रामनगर, चिंचखेड ता. बार्शीटाकळी व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी मराठा नगर, मोठी उमरी, काला चबुतरा व बाळापूर येथील चौघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यूरविवारी आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. हा रुग्ण इकबाल कॉलनी येथील ४५ वर्षीय पुरुष असून, त्यांना २२ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते.१४ जणांना डिस्चार्जरविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार जण, कोविड केअर सेंटर अकोला येथून चार जण, आयकॉन हॉस्पीटल येथून चार जण तर कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन जण, अशा एकूण १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३३१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण दाखलआतापर्यंत १९८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३३१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुुरु आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला