शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

लेटलतिफ ११ अधिकाऱ्यांची एक दिवसाची वेतन कपात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 10:46 IST

सप्टेंबर महिन्यातील वेतनातून एक दिवसाची वेतन कपात करण्यात येणार आहे.

अकोला : नियोजित वेळेपेक्षा कार्यालयात उशिरा येणाºया जिल्हा परिषदेच्या लेटलतिफ ११ प्रशासन अधिकाऱ्यांच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांनी ९ सप्टेंबर रोजी दिला. त्यानुसार संबंधित प्रशासन अधिकाºयांच्या सप्टेंबर महिन्यातील वेतनातून एक दिवसाची वेतन कपात करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी ३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद परिसरातील समाजकल्याण, लघुसिंचन, पशुसंवर्धन, महिला बालकल्याण, सामान्य प्रशासन, पंचायत, बांधकाम, कृषी, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, अर्थ इत्यादी इत्यादी विभागांच्या कार्यालयांना भेट देऊन पाहणी केली होती. त्यामध्ये कार्यालयात नियोजित वेळेपेक्षा उशिरा येणाºया अधिकारी व कर्मचाºयांची माहिती घेण्यात आली. त्यामध्ये विविध विभागातील ११ सहायक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि विविध संवर्गातील ९७ कर्मचारी कार्यालयात नियोजित वेळेपेक्षा उशिरा आल्याचे आढळून आले होते. कार्यालयात उशिरा येणाºया १०८ अधिकारी व कर्मचाºयांना मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी त्याच दिवशी सायंकाळी कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस बजावली होती. त्यापैकी कार्यालयात उशिरा येणाºया जिल्हा परिषदेच्या ११ सहायक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकाºयांच्या वेतनातून एक दिवसाची वेतन कपात करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी दिला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील ११ प्रशासन अधिकाºयांच्या सप्टेंबर महिन्यातील वेतनातून एक दिवसाच्या वेतनाची कपात जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.निर्धारित वेळेपेक्षा कार्यालयात उशिरा आल्याचे आढळून आलेल्या जिल्हा परिषदेच्या ११ सहायक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकाºयांच्या वेतनातून एक दिवसाची वेतन कपात करण्याचा आदेश दिला आहे.- सौरभ कटियारमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद