शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

डाक कर्मचा-यांचा एक दिवसीय लाक्षणिक संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2017 03:08 IST

कृती समिती सदस्यांनी मुख्य डाक घरासमोर धरणे दिले.

अकोला, दि. १६- ऑल इंडिया पोस्टल एम्लॉइज युनियन (एनएफपीई) व नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्लॉइजन (एफएनपीओ) या डाक विभागाच्या दोन संघटनांनी गुरुवार, १६ मार्च रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला. संपादरम्यान दोन्ही संघटनांच्या कृती समिती सदस्यांनी मुख्य डाक घरासमोर धरणे दिले. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर निर्माण झालेली विसंगती दूर करावी, १0 ते ३0 टक्क्यांपर्यंतचा घरभाडे भत्ता मंजूर करावा, २0१६ पूर्वीच्या नवृत्ती वेतनधारकांसंदर्भात सातव्या वेतन आयोगाने सुचविलेल्या तरतुदींची त्वरित अंमलबजावणी व्हावी, नवीन पेशन स्किम रद्द करून १ मार्च २0१४ नंतर डाक खात्यात रुजू झालेल्या कर्मचार्‍यांना पारंपरिक पेन्शन मंजूर करा, ग्रामीण डाक सेवकांना खात्यात सामावून त्यांना नियमित कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन, नवृत्तीवेतन व अन्य लाभ द्यावे, डाक विभागात रोजंदारीवर काम करणार्‍या कामगारांची सेवा नियमित करून त्यांना वेतन व इतर आर्थिक लाभ देण्यात यावेत. सातव्या वेतन आयोगातील किमान वेतनप्रमाणे त्यांच्या वेतनात सुधारणा करण्यात याव्या. सरकारी कार्यप्रणालीचे खासगीकरण व कंत्राटीकरण थांबविण्यात यावे. बढती मिळालेल्या कर्मचार्‍यांना नवीन कॅडरमध्ये प्रवेश देण्यात यावा, नवीन पद भरतीच्या अडचणी तत्काळ दूर करून ती भरण्यात यावी, अनुकंपा भरतीवरील ५ टक्के बंधन दूर करून पात्र उमेदवारांना नियुक्ती द्याव, डाक विभागात विविध पदांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या वेतनात समानता आणावी या व इतर अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. यावेळी संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष विनोद पाटील, धनंजय यमतकर, आर.एन. निंदाने, व्ही.बी. हिवराळे, सचिव शाकीर अहमद, गजानन बाबर, जि.आर. इंगळे, एल.एम. उजवणे, कोषाध्यक्ष व्ही. व्ही. तांदळे, व्ही. व्ही. अहीर, आर.ए. कुळकर्णी, एस.एस. मोडक यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.