शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

विलीनीकरणाच्या विरोधात राष्ट्रीयीकृत बँकांचा एक दिवसीय संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:19 IST

अकोला: राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण आणि विलीनीकरण होऊ नये या प्रमुखसह इतर ११ मागण्यांसाठी देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांचे दहा लाख कर्मचारी-अधिकारी मंगळवारी एक दिवसीय लाक्षणिक संपावर होते. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या आवाहनास प्रतिसाद देत अकोल्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारीदेखील यामध्ये सहभागी झाले होते. गांधी मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर सकाळी अकरा वाजता केंद्र शासनाच्या धोरणाविरुद्ध निदर्शने देत संप यशस्वी केला. 

ठळक मुद्देयुनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या आवाहनास प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण आणि विलीनीकरण होऊ नये या प्रमुखसह इतर ११ मागण्यांसाठी देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांचे दहा लाख कर्मचारी-अधिकारी मंगळवारी एक दिवसीय लाक्षणिक संपावर होते. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या आवाहनास प्रतिसाद देत अकोल्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारीदेखील यामध्ये सहभागी झाले होते. गांधी मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर सकाळी अकरा वाजता केंद्र शासनाच्या धोरणाविरुद्ध निदर्शने देत संप यशस्वी केला. बँकिंग क्षेत्रातील कर्मचार्‍यांच्या ९ संघटनांनी एकत्रित येऊन हा विरोध दर्शविला. देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांनी एकाच वेळी संप पुकारल्याने व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्यांचे दैनंदिन आर्थिक व्यवहार विस्कळीत झाले होते.सरकारी बँकांचे कुठल्याही परिस्थितीत खासगीकरण आणि विलीनीकरण करण्यात येऊ नये, मोठय़ा उद्योगपतींनी बुडविलेली कज्रे माफ करू नये, संसदीय समितीने अनुत्पादक मालमत्तेच्या (एनपीए) वसुलीसंदर्भात केलेल्या सूचना अमलात आणाव्या, जाणूनबुजून बँकेचे कर्ज बुडवणे हा गुन्हा ठरविण्यात यावा, यासाठी संसदेत कायदा पारित केला जावा, मोठमोठय़ा उद्योगपतींना दिलेली कज्रे अनुत्पादक झाल्यास बँक प्रबंधानातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी, अनुत्पादक मालमत्तेच्या (एनपीए) वसुलीसाठी कठोर पावले उचलावीत, जुलमी एफआरडीआय ( फायनान्सीएल रिज्युलेशन अँन्ड डिपॉझिट इन्शुरन्स बिल २0१७) विद्येयक रद्द करावे, जीएसटीच्या नावाखाली बँकेतील विविध सेवांचे चाज्रेस वाढवून सामान्य जनतेची पिळवणूक करू नये, अनुकंपा तत्त्वावर नोकरी संदर्भात सरकारच्या आदेशाचे तंतोतंत पालन व्हावे, नोटाबंदीच्या संदर्भात बँकांना आलेल्या संपूर्ण खर्चाचा भार भारत सरकारने उचलावा, नोटाबंदी सरकारी योजना होती, नोटाबंदी राबविण्यासाठी बँकांना प्रचंड खर्च आला. यामुळे बँकांना नफ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. एप्रिल २0१0 नंतर भरती झालेल्या सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, नोकरभरती करावी आदी ११ मागण्यांसाठी निदर्शने केली गेलीत. बँक संघटनेचे नेते श्याम माईणकर, दिलीप पिटके, प्रकाश दाते, उमेश पवार, सुधीर देशपांडे, प्रशांत अग्निहोत्री, सुनील दुर्गे आदींची समयोचित भाषणे झालीत. संप यशस्वी करण्यासाठी दिलीप देशमुख, बैस, करम्बडेकर, प्रकाश देशपांडे, उमेश शेळके, प्रवीण महाजन, संजय पाठक, अनिल मावळे, अनिल बेलोकार. गांधी, यादव, सूर्यवंशी, श्याम पिंपरकर, लोडम, मोतलग, बायस, काळणे, नवथळे, यांनी अथक परिश्रम घेतलेत.