अकोला : राष्ट्रीय महामार्गावरील शेगाव टी पॉइंट परिसरात असलेल्या शाकम्बरी इंडस्ट्रिजवरील दरोडा प्रकरणातील एका आरोपीस डाबकी रोड पोलिसांनी अटक केली. न्यायालयात त्याला हजर करण्यात आले असता ४ ऑक्टोबरपर्यंंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. १६ ऑगस्ट रोजी रात्री १.४५ वाजताच्या सुमारास दरोडेखोरांनी शाकम्बरी इंडस्ट्रिजवर दरोडा घातला होता. यातील आरोपी शेख जावेद शेख रहमान (३५ रा. इंदिरानगर आकोट फैल) याला डाबकी रोडचे एपीआय प्रवीण धुमाळ यांनी अटक केली. यावेळी इंडस्ट्रिजमध्ये दिनकर प्रल्हाद पागधुने, बाळकृष्ण रावणकर, अनिल ढोले हे कर्मचारी होते. हे तिघे कर्मचारी झोपेत असताना, दरोडेखोरांनी त्यांना उठविले आणि त्यांचे कपडे काढून त्यांना मारहाण केली. नंतर तिघांनाही शौचालयामध्ये बंद करून ठेवले आणि इंडस्ट्रिजमधील चार ते पाच बॅटरी आणि इतर साहित्य असे एकूण ३९ हजार ६00 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणाचा तपास करून एपीआय धुमाळ यांनी एकास ताब्यात घेतले.
शाकम्बरी इंडस्ट्रिजवरील दरोडा प्रकरणातील एकास अटक
By admin | Updated: October 3, 2014 01:25 IST