शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अजून दीड वर्ष चालेल ‘आरओबी’चे बांधकाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 12:35 IST

अकोला: मागील अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या डाबकी रेल्वे गेटजवळील ‘आरओबी’च्या (रेल्वे ओव्हर ब्रीज) बांधकामास अजून दीड वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे संकेत आहेत.

- संजय खांडेकरअकोला: मागील अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या डाबकी रेल्वे गेटजवळील ‘आरओबी’च्या (रेल्वे ओव्हर ब्रीज) बांधकामास अजून दीड वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे संकेत आहेत. रेल्वे हद्दीतील पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी भुसावळ रेल्वे विभागाने १८ महिन्यांचा कालावधी मागितला आहे. त्यामुळे अकोलेकरांना आजपासून पुन्हा दीड वर्षांपर्यंत प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.अकोला-शेगाव मार्गावरील रहदारी सुरळीत करण्यासाठी जोडण्यात येत असलेल्या डाबकी आरओबीचे बांधकाम २०१६ पासून सुरू असून, आता त्याचे बांधकाम शेवटच्या टप्प्यात आहे. काही दिवसांतच हा पूल लोकसेवेत रुजू होईल, असे वाटत होते; मात्र भुसावळ रेल्वे विभागाने त्यांच्या हद्दीतील पूल बांधकामासाठी १८ महिन्यांचा अवधी मागितल्याने अकोलेकरांना आणखी दीड वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे. जवळपास १६ कोटींच्या खर्चातून डाबकी रेल्वे ओव्हर ब्रीज उभारण्याचे काम २७ आॅक्टोबर २०१६ पासून झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखित सुरू असलेले काम आता शेवटच्या टप्प्यात असून, आगामी मार्च अखेरपर्यंत दोन्हीकडील डांबरीकरणही पूर्ण होणार आहे. डाबकी रेल्वे गेटच्या दोन्हीकडील भाग तयार असले तरी रेल्वे रुळावरून जाणाऱ्या पुलाच्या बांधकामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. रेल्वेच्या हद्दीत असलेले हे बांधकाम रेल्वे विभागातील अभियंत्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. भुसावळ विभागाचे मुख्य अभियंता यांच्या पुढाकारात हा सर्व्हे होणार आहे. त्यानंतर या बांधकामास सुरुवात होईल, असेही सूत्रांनी सांगितले आहे. रेल्वे गेटची वाहतूक पर्यायी मार्गे वळविणार!पुलाचे बांधकाम सुरू होण्याआधी रेल्वे विभागातर्फे रेल्वे गेटच्या मार्गे असलेली दैनंदिन वाहतूक पर्यायी मार्गे काही अंतरावरून वळविली जाणार आहे. ही प्रक्रिया महिन्याभरात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन्हीकडील पुलाला जोडण्याचे काम सुरू होईल. यासाठी संपूर्ण टीम रेल्वेची येणार आहे. बांधकाम सुरू झाल्यापासून १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ते काम कधी सुरू होते, यावर १८ महिन्यांचा कालावधी ठरून आहे. 

-सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम शेवटच्या चरणात आहे. आमच्या हद्दीतील कामाचा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे सोपविला असून, आता पुढील बांधकाम रेल्वे विभागातर्फे पूर्ण केले जाईल.-जी. व्ही. जोशी, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला.  

 

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वे