शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने केली महावितरणची दाणादाण; शहरासह ग्रामीण भागाला फटका 

By atul.jaiswal | Updated: April 10, 2023 18:07 IST

रविवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने महावितरणची पुन्हा दाणादाण उडविली.

अकोला: रविवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने महावितरणची पुन्हा दाणादाण उडविली. अनेक ठिकाणी झाडे, झाडाच्या फांद्या,टिनपत्रे विजेच्या खांबावर येऊन पडल्याने शहरातील पाच तर ग्रामीण भागातील एक असे सहा विद्युत उपकेंद्रे प्रभावित झाली होती. परिणामी निम्म्यापेक्षा अधिक भाग तर १४५ गावांचा विजपुरवठा खंडीत झाला होता. तथापी, सोमवारी दुपारपर्यंत १२० पेक्षा अधिक गावांचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे.

वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने बाळापूर पारस या ११ केव्ही वाहिनीवर झाड पडल्याने १२ खांब तुटले/वाकल्याने वीज वाहिनी जमिनदोस्त झाली होती. त्यामुळे ३३ केव्ही बाळापूर उपकेंद्र बंद पडले होते. याशिवाय अनेक ठिकाणी टिनपत्रे,झाडाच्या फांद्या वीज वाहिन्यावर अडकल्याने ४० ते ५० लघूदाबाचे खांब वीज वाहिन्यासहीत पडले आहेत. पारस येथील चार ठिकाणाचे रोहित्र हे जमिनीलगत झुकले आहेत. बाळापूर उपकेंद्राचा वीज पुरवठा रात्रीलाच पुर्ववत करण्यात आला आहे.

ही उपकेंद्रे पडली होती बंदकडकडाटासह वीजा पडल्याने अकोला शहरातील ३३ केव्ही एमआयडीसी,३३ केव्ही सुधीर कॉलनी,३३ खडकी,३३ केव्ही वाशिम बायपास आणि ३३ केव्ही शिवाजी उपकेंद्राशी निगडीत वीज वाहिन्यांवरील ६० ते ७० पीन इन्सुलेटर व डिस्क इन्सुलेटर फुटल्याने हे उपकेंद्रे बंद पडली होती. परंतू महावितरणकडून अतीरिक्त मनुष्यबळाचा वापर करत काही तासातच शहरातील वीज पुरवठा पुर्ववत केला.

मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता फिल्डवरमुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर आणि अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट रात्रीपासूनच संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मुख्य अभियंता यांनी जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला व वीज दुरूस्तीच्या कामाला गती देण्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर हजेरी लावली.

 

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊसmahavitaranमहावितरण