शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
2
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
4
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
5
संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”
6
काजू, बदाम, पिस्ता आणि शेरनी बाई...; मतदार यादी पाहून अधिकारीही झाले थक्क! हटके नावांमागे कारण काय?
7
“भाजपाची ठोकशाही सहन करणार नाही, सत्तेचा माज उतरायला वेळ लागणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
9
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
10
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
11
"घरात चाललीय मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर...", पूजाने घेतला सोहमच्या नावाचा हटके उखाणा
12
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
13
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
14
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
15
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
16
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
17
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
18
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
19
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
20
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध आई-वडीलांचा श्याम हरवलाय..!

By admin | Updated: January 28, 2015 00:41 IST

जेष्ठ नागरिकाप्रती समाज संवेदनाहीन; वृद्ध आई वडीलांच्या छळाच्या घटनेत वाढ.

अकोला: कोणत्याही संकटाच्या क्षणी आई-वडील एकदम आठवतात. संकटकाळी आई-वडिलांना आठवणार्‍या या मुलांमधील श्याम आज कुठेतरी हरवत चाललाय; त्यामुळेच आज अनेक घरांमध्ये आई-वडिलांचा मुले अमानूष छळ करीत असल्याच्या घटना समोर येत आहेत. शहरातील कोणत्याही पोलीस ठाण्यात गेले तर तेथे दररोज मुलांची तक्रार घेऊन त्यांचे आई-वडील दिसतात. डोळय़ांमध्ये अश्रू घेऊन हे आई-वडील ठाणेदार, पोलीस कर्मचार्‍यांना आपली कर्मकहाणी सांगून, मुलांना समजावून सांगण्याची, त्यांचेवर कडक कारवाई करण्याची विनंती करतात. पोलीसही मुलांना बोलावून त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न किंवा प्रतिबंधात्मक कारवाई करतात. गत काही वर्षांपासून पोलीस ठाण्यांमध्ये मुलांकडून होत असलेल्या आई-वडिलांच्या छळाच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. लहानपणी तळहातावरील फोडासारखे जपणार्‍या मुलांना, आई-वडील वयोवृद्ध झाल्यावर का नकोशे वाटतात. हाच चिंतेचा विषय आहे. आई.. तिच्या कुटुंबासाठी समईसारखी सतत जळत असते, तर वडील कुटुंबप्रमुख या नात्याने काटकसर करून मुलांच्या शिक्षणासाठी पैसा देतात. प्रसंगी दाढीचा साबण न वापरता मुलाला सलूनमध्ये जाण्यासाठी पैसे देतात. फाटकी बनियान घालतील; परंतु मुलाला, मुलीला नवीन बनियान देतील. अशा आई-वडिलांच्या उतारवयात ही मुले त्यांना वृद्धाश्रमात जाण्याची का वेळ आणतात. आई-वडिलांचा छळ मांडणारी हीच मुलेसुद्धा उद्या आई-वडील होतील. त्यांची मुलेही त्यांना घराबाहेर हाकलतील. वृद्धाश्रमात पाठवतील. हा विचार आज कुणीच करीत नाही. खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार छगनराव इंगळे यांनी खदान पोलीस ठाण्यामध्ये दररोज आई-वडील मुलाविरुद्ध तक्रारी घेऊन येत असल्याचे सांगीतले.