शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालये बंद; पांडेबुवांची दांडी!

By admin | Updated: September 2, 2016 01:53 IST

नागरिकांना बसावे लागते ताटकळत; सहन करावे लागतात हेलपाटे. लोकमत स्टिंग ऑपरेशनमधून वास्तव अधोरेखित.

अकोला, दि. १: शहरात अनेक ठिकाणी तलाठी कार्यालय कार्यालयीन वेळेत राहत असल्याने, पांडेबुवा म्हणून ओळखले जाणारे तलाठी कार्यालयांना दांडी मारत आहेत. त्यामुळे विविध कामांसाठी तलाठी कार्यालयात येणार्‍या नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत असल्याची बाब बुधवारी ह्यलोकमतह्णने केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णमध्ये चव्हाट्यावर आली.तलाठी ह्यसाझाह्णच्या ठिकाणी तलाठी कार्यालयांमध्ये सात-बारा, फेरफार नोंदी, नमुना ८ -अ, शेतकरी असल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, तलाठी दप्तर अद्ययावत करणे इत्यादी प्रकारची कामे केली जातात. तलाठी कार्यालयाची कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंतची आहे. या कार्यालयीन वेळेत तलाठी कार्यालय सुरू असणे, कार्यालयात तलाठी उपस्थित असणे आणि नागरिकांची विविध कामे होणे अपेक्षित आहे; मात्र अकोला शहरातील अनेक तलाठी कार्यालये कार्यालयीन वेळेत बंद राहत असून, तलाठी कार्यालयांना दांडी मारत असल्याने, विविध कामांसाठी तलाठी कार्यालयात येणार्‍या नागरिकांना तलाठी कार्यालय केव्हा उघडणार, याबाबत प्रतीक्षा करीत ताटकळत बसावे लागते. तसेच कार्यालय बंद आणि तलाठी कार्यालयात हजार नसल्याने, नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत असल्याचे आढळून आले.कार्यालय सुरू; पण तलाठी गायब!मंगळवारी दुपारी २ वाजता शहरातील मोरेश्‍वर कॉलनी परिसरातील तलाठी कार्यालय सुरू होते; मात्र कार्यालयात तलाठी उपस्थित नव्हते. संबंधित तलाठय़ाने मानधनावर नेमलेला एक कर्मचारी तलाठी कार्यालयात काम करीत असल्याचे आढळून आले.असे आढळून आले वास्तव!सोमवारी दुपारी ३ वाजता शहरातील गोरक्षण रोडस्थित माधवनगरातील तलाठी कार्यालय बंद असल्याचे आढळून आले.मंगळवारी दुपारी २.३0 वाजता मोठी उमरी ग्रामपंचायत इमारतीमधील तलाठी कार्यालय बंद आढळून आले.बुधवारी सकाळी १0 ते दुपारी १२ वाजेपर्यंत शहरातील कौलखेड रोडस्थित आरोग्य नगरमधील तलाठी कार्यालय बंद आढळून आले. १२ वाजता कार्यालय उघडण्यात आले. तोपर्यंत कार्यालय केव्हा उघडणार, यासाठी नागरिक ताटकळत कार्यालयाबाहेर बसले होते.-कार्यालयीन वेळेत साझाच्या ठिकाणी तलाठी कार्यालय सुरू असणे आणि कार्यालयात तलाठी उपस्थित असणे आवश्यक आहे. कार्यालय बंद आणि कार्यालयात तलाठी उपस्थित नसल्याचे आढळून आले असेल तर, संबंधित तलाठय़ांना यासंदर्भात नोटीस बजावून, खुलासा मागविण्यात येणार आहे.- संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, अकोला