शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी ‘सील’ न उघडता खाली हात परतले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 14:06 IST

खरेदी बंद किंवा गोदाम सील करण्याचा आदेश कुणीही दिला नसताना गोदामाला सील लागले. परिणामी, त्यावेळेसपासून खरेदी बंद पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तालुका खरेदी-विक्री संघटनेमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी सुरू असताना यामध्ये गैरप्रकार आढळून आल्याने खरेदीच्या गोदामाला ‘सील’ लागले. हे ‘सील’ अनेक दिवसांपासून कायम असल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी रखडली असून, ज्या शेतकºयांनी नोंदणी केली, त्यांचा माल खरेदी होत नसल्याने याला दोषी कोण, असा प्रश्न शेतकरी वर्गात उपस्थित होत आहे.शासनाची नाफेड अंतर्गत खरेदी सुरू झाली. नाफेडची खरेदी एजन्सी म्हणून तालुका खरेदी-विक्री संख्या आहे. ज्या शेतकºयांना आपला माल विकायचा आहे, त्यांनी खरेदी-विक्री संस्थेमध्ये आॅनलाइन नोंदणी केली असून, नंबरप्रमाणे खरेदी सुरू झाली होती. मूग खरेदी सुरू असताना यामध्ये गैरप्रकार होत असल्याची भनक याच संस्थेचे संचालक पुंडलिक अरबट यांना लागली असता त्यांनी गोदाम गाठले व तिथे संबंधित अधिकाºयांना याबाबत माहिती दिली. नायब तहसीलदार व सहायक निबंधक यांनीा पंचनामा केला; परंतु खरेदी बंद किंवा गोदाम सील करण्याचा आदेश कुणीही दिला नसताना गोदामाला सील लागले. परिणामी, त्यावेळेसपासून खरेदी बंद पडली. खरेदी बंद पडल्यामुळे नोंदणीकृत शेतकºयांचा माल खरेदी होत नसल्याने माल कुठे विकायचा, यात आमचा दोष काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत असल्याने तालुका खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.

गोदामाला ‘सील’ लावले कुणी?गोदामाला सील कुणी ठोकले, यावर माहिती घेतली असता खरेदी-विक्रीचे संचालक पुंडलिक अरबट यांनी लावले असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी व खरेदी-विक्रीचे अध्यक्ष यांनी सांगितले; पण हे करण्याचे अधिकार कुणाला व कोणत्या अधिकारात लावल्या गेले, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.तेल्हारा नाफेडमार्फत मूग खरेदीबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने सहायक निबंधक व नायब तहसीलदार तेल्हारा यांनी पंचनामा केला आहे. त्यापुढील कार्यवाही करण्याबाबत जिल्हा पणन अधिकारी यांना वेळीच कळविण्यात आले आहे. पुढील कार्यवाही मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा पणन अधिकारी पवार यांच्यामार्फत सुरू आहे.- डॉ. प्रवीण लोखंडे,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हारा