शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

अधिकारी-पदाधिकारी वाद चिघळला!

By admin | Updated: November 30, 2014 01:02 IST

उपायुक्तांच्या निलंबनाचा ठराव मांडणार; पदाधिका-यांची पत्रकार परिषदेत घोषणा.

अकोला: महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकार्‍यांमधील वाद चिघळला आहे. उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी आजपर्यंत केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला नगरसेवकांनी कधीही अडथळा निर्माण केला नाही. शहर विकासासाठी नियमानुसार कारवाई करणार्‍या अधिकार्‍यांना भाजपचा कधीही विरोध नाही; परंतु चिंचोलीकरांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार अशोभनीय असल्यामुळे त्यांच्या विरोधात निलंबनाचा ठराव मांडला जाईल, अशी घोषणा महापालिका पदाधिकार्‍यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून कलम २४४ व २४५ नुसार उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज हटविणे अपेक्षित आहे. यामध्ये दुकानाच्या नामफलकाचा समावेश नाही. शिवाय न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सायंकाळी सात वाजतानंतर अतिक्रमण हटाव मोहीम राबवता येत नाही. संबंधित अधिकारी क्षेत्रीय अधिकार्‍यांसमवेत केवळ पाहणी करू शकतात. असे असताना उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी होर्डिंग्ज हटवण्याच्या नावाखाली २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातनंतर दुकानांचे फलक व पाट्या काढण्याची मोहीम सुरू केली. ही बाब सर्वथा कायद्याचा व उच्च न्यायालयाच्या सूचनांचा अवमान करणारी असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांनी दिली. ही कारवाई नेमकी कोणत्या नियमांच्या आधारे केली, अशी विचारणा महापौर उज्ज्वला देशमुख यांनी केली असता, चिंचोलीकरांनी लेखी पत्र देण्याची मागणी केली. आम्ही त्यांच्या दालनात जाऊन या नियमांची विचारणा केली असता, त्यांनी उत्तर न देता, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या समक्ष धक्काबुक्की केली. उपायुक्त चिंचोलीकर यांना समस्यांचे निराकरण करण्याची विनंती केल्यावर ते उर्मट व उद्धटपणाची वागणूक देतात. या शहरात अधिकार्‍यांच्या विकासात्मक कामात कधीही हस्तक्षेप होणार नाही; परंतु विकास न करता, मनमानी कारवाया केल्यास हा प्रकार कदापि खपवून घेतला जाणार नसल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. यासाठी येत्या २ डिसेंबर रोजी विशेष सभेमध्ये चिंचोलीकर यांच्या निलंबनाचा ठराव घेणार असल्याची माहिती अग्रवाल यांनी यावेळी दिली. *मनपाची २ डिसेंबर रोजी विशेष सभाउपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या विरोधात ठराव घेण्यासाठी २ डिसेंबर रोजी मनपात विशेष सभेचे आयोजन केल्या जाईल. शनिवारी महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या दालनात सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली.