शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात तोडफोड करून ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 19:38 IST

Murtijapur News जिल्हा परिषद सदस्य अप्पू तिडके व पंचायत समिती सदस्य नकुल पाटील काटे, देवाशीष भटकर यांनी  कार्यालयाला टाळे ठोकले.

- संजय उमकमूर्तिजापूर :  पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात नेहमी कोणीच उपस्थित राहत नसल्याने नागरीकांची कामे होत नसल्याने जिल्हा परिषद सदस्य अप्पू तिडके व पंचायत समिती सदस्य नकुल पाटील काटे, देवाशीष भटकर यांनी  कार्यालयाला १० नोव्हेंबर रोजी ३ वाजता टाळे ठोकले.                     मंगळवारी अनेक नागरीक कार्यालयात कामानिमित्त कार्यालयाच्या बाहेर कर्मचाऱ्यांची वाट पहात उभे असतांना ही बाब उपस्थित जिल्हा परिषद सदस्य अप्पू तिडके, पंचायत समिती सदस्य नकुल पाटील काटे व देवाशीष भटकर यांच्या लक्षात आणून दिली असता त्यांनी कर्मचाऱ्यांची शोधाशोध केली पण कुठलाही कर्मचारी दिसून आला नाही. या कार्यालयांतर्गत अनेक गैर प्रकार चालत असल्याची माहिती आहे.या गैर प्रकाराला आळा घालण्यासाठी तीनही स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी पंचायत समितीच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कार्यालयाला कुलूप ठोकले दरम्यान सोमवारी पोही येथील सरपंचाने केलेल्या आत्मदहन प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहूजन आघाडीचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मायाताई नाईक यांचे पती संजय नाईक यांनी पंचायत विभागाची व महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कार्यालयाल्याची कुलूप तोडून टेबल खुर्च्यांची व संगणकाची तोडफोड केली. कार्यालयीन कामकाजाची वेळ सव्वा सहा वाजताची असताना साडेपाच वाजताच सहा कर्मचारी वगळता संपूर्ण कार्यालय रिकामे आढळून आल्याने संताप अनावर झाल्याने संजय नाईक यांनी कार्यालयात तोडफोड केली व गटविकास अधिकारी येईपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याचा हट्ट त्यांनी केला. परंतु उपस्थितांनी त्यांची समजूत घालुन प्रकरणावर पडदा टाकला असला तरी कामकाज सुरळीत होत नाही व अधिकारी वेळेत उपस्थित राहणार नाही तोपर्यंत आपण अशीच तोडफोड करत राहणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले कार्यालयाची जागा अपुरी असल्याने मी व्यक्तिगत पंचायत समिती कार्यालयात तळमजल्यावरील कार्यालयात बसून संपूर्ण कार्यालयीन कामकाज पहातो.  कार्यालयात दोन अॉपरेटर सह आणखी कर्मचारी उपस्थित असतात ऐनवेळेळी सुटी मागुन ते लोक बाहेर गेल्याने सदर प्रकार घडला. टोळे लावतेवेळी मी संबंधित सदस्यांना भेटलो पण त्यांनी ताळा लावण्याचा कार्यक्रम पुर्ण केला. - उमेश निखाडेसहायक कार्यक्रम अधिकारी, म. गांधी रो. ह. यो पंचायत समिती मूर्तिजापूर

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर