लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : घरात सुनेला एकटी पाहुण तिचा विनयभंग करणार्या सासर्याविरोधात अकोट फैल पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर सासरा पसार होण्यात यशस्वी झाला. अकोट फैलमधील रहिवासी विवाहितेचे पती हे कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे घरात कोणीच नव्हते. या संधीचा फायदा घेत सासरा इनायत उल्ला शाह नबी उल्ला शाह याने विवाहितेचा विनयभंग करून, तिला शिवीगाळ केली. ही माहिती कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही विवाहितेला दिली. ही बाब विवाहितेने पतीला सांगितली. त्यानंतर सासरा इनायत उल्ला शाह याच्याविरोधात अकोट फैल पोलीस स्टेशनला विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सासर्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर सासरा फरार झाला आहे.
सुनेचा विनयभंग करणार्या सासर्याविरुद्ध गुन्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:07 IST
अकोला : घरात सुनेला एकटी पाहुण तिचा विनयभंग करणार्या सासर्याविरोधात अकोट फैल पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर सासरा पसार होण्यात यशस्वी झाला.
सुनेचा विनयभंग करणार्या सासर्याविरुद्ध गुन्हा!
ठळक मुद्देघटनेनंतर सासरा पसार!अकोट फैल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल