शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
3
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
4
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
5
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
6
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
7
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
8
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
9
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
10
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
11
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
12
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
13
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
14
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
15
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
16
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
17
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
18
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
19
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
20
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?

शालेय पोषण आहाराच्या दर्जाकडे डोळेझाक

By admin | Updated: January 12, 2017 02:20 IST

पोषण आहार अधीक्षक पदाधिका-यांनाही जुमानत नसल्याचा प्रकार जि.प. सभेत समोर आला.

अकोला, दि. ११- जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या मध्यान्ह भोजन योजनेचा आहार अत्यंत निकृष्ट आहे. तांदूळ, मसाले, इतर साहित्याची तपासणी कोणी कधी केली, याच्या अहवाल नोंदवह्या बारा महिन्यांपासून कोर्‍या आहेत. त्यावर कोणतेही शेरे नाहीत, हा प्रकार गंभीर असतानाही त्याची माहिती दडवण्याचा प्रकार जिल्ह्यातील शालेय पोषण आहार अधीक्षकांकडून केला जात आहे. कारणे दाखवा नोटिस बजावलेल्या अकोट, तेल्हारा, बाळापूर येथील अधीक्षकांनी त्याचे उत्तरही न देण्याचा उद्दामपणा केला आहे. त्यातून ते कुणालाच जुमानत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्यावर कारवाई न केल्यास अधिकार्‍यांनी ध्यानात ठेवावे, असा इशारा शिक्षण समितीच्या सभेत बुधवारी देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक सभापती पुंडलिकराव अरबट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सदस्यांनी विविध मुद्दे मांडले. शालेय पोषण आहाराचा जिल्ह्यात बोजवारा उडालेला आहे ,या संदर्भात लोकमत ने स्टींग ऑपरेशनकरून जिल्हाभरातील विदारक चित्र समोर मांडले होते. त्यांचे पडसाद या बैठकीत उमटले, कंत्राटदाराकडून हळद पावडर- २0,५00, मिरची पावडर- १९,३00, गरम मसाला- १९,३00, मोहरी- ७,४00, वाटाणा- ६,३९0, तूर डाळ- १५,४00 प्रतिक्विंटल दराने पुरवठा केला जातो. प्रत्यक्षात बाजारभावाच्या दोनशे टक्केपेक्षाही अधिक ते दर असले तरी या वस्तूंचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. पुरवठा होणारी तूर डाळ बाजारात सध्या ७0 रुपये प्रतिकिलोची असल्यासारखी आहे. त्यातच कमी वजनाच्या तांदळाचे कट्टे शाळांच्या मुख्याध्यापकाकडून का स्वीकारले जातात, या गंभीर प्रकारांकडे अधिकारी का दुर्लक्ष करतात, या मुद्यांवर सभापती अरबट यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. पोषण आहार नोंदीच्या वह्यांमध्ये भेट देणारांचे शेरेच नाहीत. त्या वह्या वर्षभरापासून कोर्‍याच आहेत. त्यामुळे या गंभीर घोळाला पाठीशी घालणारांची आता गय केली जाणार नाही, असेही अरबट यांनी सुनावले.