शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

नुटा, विज्युक्टाची युती झाल्यास इच्छुक उमेदवारांना निवडणूक जाणार जड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:24 IST

यंदाच्या निवडणुकीमध्ये शिक्षण क्षेत्रात दबदबा असणारी नुटा व विज्युक्टाची युती होण्याची शक्यता आहे.

- नितीन गव्हाळेअकोला: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिक्षक मतदार नोंदणीची प्रक्रिया झाली आहे. आता शिक्षक संघटनांकडून मोर्चेबांधणी सुरू असून, शिक्षक मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास वेग आला आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये शिक्षण क्षेत्रात दबदबा असणारी नुटा व विज्युक्टाची युती होण्याची शक्यता आहे. यंदा ही युती झाली तर इतर संघटनांच्या इच्छुक उमेदवारांना शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जड जाणार आहे.सध्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणनीती ठरविण्यासोबतच शिक्षक मतदारांसोबत संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यंदाच्या निवडणुकीत सर्वच शिक्षक संघटना ताकदीने उतरणार आहेत. या मतदारसंघासाठी शिक्षक संघटना, शिक्षक नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काही शिक्षक संघटना मतदारसंघ आणि इच्छुक उमेदवारांची चाचपणी करीत आहेत; परंतु या मतदारसंघामध्ये माजी आमदार बी. टी. देशमुख यांची नुटा ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभी राहील, त्या उमेदवाराचे पारडे जड मानल्या जाते. यापूर्वी दोन निवडणुकांमध्ये नुटा, विज्युक्टा आणि विमाशिसं या संघटनांमध्ये युती होती. त्यामुळे लागोपाठ दहा वर्षे वसंतराव खोटरे या मतदारसंघाचे आमदार होते; परंतु तिसऱ्या निवडणुकीत या संघटनांमध्ये फूट पडली. त्यामुळे त्याचा लाभ शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांना मिळाला. यंदा मात्र चित्र वेगळे राहू शकते. माजी आमदार बी. टी. देशमुख यांची नुटा आणि खोटरे यांची पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना आणि विदर्भ ज्युनिअर टीचर्स असोसिएशनमध्ये युती करण्यासाठी चर्चा सुरू आहे. या तीन संघटना एकत्र आल्या तर त्यांच्या उमेदवाराला निवडून येणे फार कठीण नसल्याचे बोलले जाते. कारण शिक्षण क्षेत्रात बी. टी. देशमुख हे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा शब्द प्रमाण आहे. यंदा विज्युक्टाकडून प्रा. डॉ. अविनाश बोर्डे शिक्षक मतदारसंघाकडून नशीब अजामवणार आहेत. त्यांना नुटा, विमाशिसंचा पाठिंबा मिळाला तर इतर इच्छुकांसमोर अडचण निर्माण होऊ शकते. यासोबतच शिक्षक महासंघाचे शेखर भोयर, संगीता शिंदे, रमेश चांदुरकर, वाशिमचे किरण सरनाईक, राजकुमार बोनकिले हेसुद्धा तयारी करीत आहेत. इच्छुक उमेदवारसुद्धा बी. टी. देशमुख यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नुटा, विज्युक्टा व खोटरे यांची विमाशिसंची युती होईल की नाही, हा कळीचा मुद्दा आहे; परंतु ही युती झाली तर यंदाची शिक्षक मतदारसंघाची निवडणूक निश्चितच सोपी राहणार नाही.

भाजप शिक्षक सेलमुळेही रंगत!शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा भाजप शिक्षक सेलसुद्धा ताकदीने मैदानात उतरला आहे. भाजप शिक्षक सेलची मोट बांधणारे नितीन खर्चे यांनी शिक्षक मतदार नोंदणीसोबत शिक्षक संपर्कावर भर दिला आहे. भाजप शिक्षक सेल मैदानात उतरल्यामुळे शिक्षक मतदारसंघात चांगलीच रंगत पाहावयास मिळणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला