शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

नापिकीने हिरावले सौभाग्याचे कुंकू!

By admin | Updated: April 17, 2016 01:14 IST

देऊळगावराजा तालुक्यातील चिंचोली बुरकूलची घटना; युवा शेतकर्‍याची आत्महत्या चटका लावणारी.

नीलेश शहाकार / बुलडाणाविलास व ज्योती यांच्या संसार वेलीवर उमललेले पायल नावाचे लहान फूल..या तिघांचा परिवार दीड एकर शेतीवर आपला चरितार्थ चालवत होता.. शेतातील उत्पन्नाला जोड म्हणून ते शे तमजुरीही करायचे आणि संसाराचा गाडा हाकायचे ..पण या संसाराला दृष्ट लागली..दोन दिवसां पूर्वी घराच्या कर्त्याधर्त्या विलासने फासावर लटकवून घेतले..अन् सर्व होत्याचे नव्हते झाले. ज्योतीच्या सौभाग्याचे कुंकू रुसले, तर तीन वर्षाच्या पायलच्या डोक्यावरील पितृछत्र हरविले. हे सर्व नापिकीने केले..देऊळगावराजा तालुक्यातील चिंचोली बुरकूल येथे विलास जगन बुरकूल या २५ वर्षीय युवा शे तकरी परिवराची ही व्यथा. चार वर्षांपूर्वी नजीकच्या खैरव गावातील ज्योती हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. लग्नानंतर विलास आई-वडिलापासून वेगळा राहायला लागला. त्यांना मुलगी झाल्यानंतर वाढलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवत, विलासने आपल्या शेतात आणखी कष्ट करण्यास सुरुवात केली; मात्र त्याच्या कष्टाला निसर्गाने साथ दिली नाही. विलासकडे असणार्‍या चिंचोली शिवारात गट नं.९६ मधील दीड एकर कोरडवाहू शेतात त्याने २0१४ मध्ये सोयाबीनची पेरणी केली; मात्र ऐन हंगामात पावसाने पाठ फिरवली व पीक हातचे गेले. निसर्गाशी दोन हात करीत दुबार पेरणीसाठी विलासने स्टेट बँक ऑफ हैदराबाद देऊळगावराजा शाखेतून कर्ज घेतले; मात्र त्याच्या मागे लागलेली नापिकीची साडेसाती थांबता थांबत नव्हती. २0१५ मध्ये खासगी कर्ज घेत, त्याने शेतात कपाशी पेरली. कपाशी बोंडावर आली यावेळी अवकाळी पावसामुळे सारे पीक जमीनदोस्त केले. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा अशा वैफल्यग्रस्त परिस्थितीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी उभी केलेली शेतीची लढाई हा युवा शेतकरी हरला होता. पत्नी ज्योती व चिमुकली पायल या दोन जिवांचा विचार न करता, विलासने मृत्यूला जवळ केले. यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.