शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सर्दी, ताप, खोकल्यासोबतच अस्थमाच्या रुग्णांची संख्या वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 13:33 IST

अकोला : बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप सोबतच अस्थमा व दम्याच्या आजारामुळे अकोलेकर त्रस्त आहेत. परिणामी दवाखाने, रुग्णालये हाउसफुल्ल झाले असून, नागरिकांनी योग्य उपाय योजना करून आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

अकोला : बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप सोबतच अस्थमा व दम्याच्या आजारामुळे अकोलेकर त्रस्त आहेत. परिणामी दवाखाने, रुग्णालये हाउसफुल्ल झाले असून, नागरिकांनी योग्य उपाय योजना करून आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.थंडीसोबतच शहरात धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्याचा थेट परिणाम अकोलेकरांच्या आरोग्यावर होत असून, फुफ्फुस व स्वसनाशी निगडित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. शिवाय, बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला अन् तापीच्या आजाराची साथदेखील सुरू आहे. एकाच वेळी विविध आजारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आजार लवकर बरा होत नसल्याने स्वाइन फ्लू, चिकुनगुनियासदृश लक्षण आढळून येत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दवाखाने, रुग्णालये हाउसफुल्ल झाले आहेत. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास घाबरण्यासारखे कारण नसल्याचे डॉक्टरांचे मत आहे; परंतु आजारच होऊ नये म्हणून नागरिकांनी योग्य आहार आणि नियमित व्यायाम करा, असा सल्लाही तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.पॅरालिसीस व ह्रदयविकाराचेही प्रमाण वाढले!थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे मेंदुला व ह्रदयाला आवश्यक रक्त पुरवठा होत नाही. परिमाणी, या दिवसात पॅरालिसीस व ह्रदयविकाराचे प्रमाणही वाढते.बचावासाठी हे करा!रात्रीच्या जेवणानंतर थंड हवेत फिरणे टाळावे.रात्रीचा प्रवास टाळावा.थंड पाण्याचे सेवन टाळा.अती धावपळ टाळावी.

या दिवसात सर्दी, ताप, खोकल्यासह अस्थमाचे रुग्ण अधिक आढळतात. शिवाय, पॅरालिसीस व ह्रदयविकाराचेही प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत योग्य काळजी व नियमित व्यायाम हेच आजारापासून आपला बचाव करू शकतात.-डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाhospitalहॉस्पिटल