शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘नरेगा ‘ लाभार्थ्यांच्या अडचणींचा घेतला जाणार शोध; अकोला जिल्ह्यात तालुका स्तरावर मेळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 18:53 IST

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) कामांसंदर्भात लाभार्थ्यांच्या अडचणींचा शोध घेऊन, उपाययोजना करण्यासाठी अकोला जिल्ह्यात तालुका स्तरावर लाभार्थ्यांचे मेळावे घेण्याचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेमार्फत राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येतात.लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि अडचणींवर तातडीने उपाययोजना करून रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर संबंधित पंचायत समितींमध्ये लाभार्थ्यांचे मेळावे येणार आहेत.

- संतोष येलकर

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) कामांसंदर्भात लाभार्थ्यांच्या अडचणींचा शोध घेऊन, उपाययोजना करण्यासाठी अकोला जिल्ह्यात तालुका स्तरावर लाभार्थ्यांचे मेळावे घेण्याचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेमार्फत राबविण्यात येणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने सिंचन विहिरी, फळबाग लागवड, विहिरींचे पुनर्भरण व इतर कामांसंदर्भात लाभार्थ्यांच्या अनेक प्रकारच्या अडचणी आणि तक्रारी असतात. त्यानुषंगाने ‘नरेगा’ अंतर्गत लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि अडचणींवर तातडीने उपाययोजना करून रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर संबंधित पंचायत समितींमध्ये लाभार्थ्यांचे मेळावे घेण्याचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेमार्फत ९ मार्चपासून राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुका स्तरावर घेण्यात येणाºया नरेगा लाभार्थ्यांच्या मेळाव्यात नरेगा उपजिल्हाधिकाºयांसह संबंधित अधिकारी उपस्थित राहणार असून, मेळाव्यांमध्ये लाभार्थ्याच्या अडचणींचा शोध घेण्यात येणार आहे., तसेच अडचणी लक्षात घेऊन कामे मार्गी लावण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.तलाठ्यांकडून लाभार्थ्यांना नोटीस !‘नरेगा’ अंतर्गत लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मेळाव्याला लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याबाबत जिल्ह्यातील नरेगा अंतर्गत लाभार्थ्यांना तलाठ्यांकडून नोटीस देण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी (नरेगा ) अशोक अमानकर यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिले.नरेगा अंतर्गत कामांसंदर्भात लाभार्थ्यांच्या अडचणी, संबंधित यंत्रणांसंदर्भात तक्रारी जाणून घेणे आणि कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुकास्तरावर लाभार्थ्याचे मेळावे घेण्यात येणार आहेत.-अशोक अमानकर, उपजिल्हाधिकारी (नरेगा),अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना