शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

‘एनआरसी’ केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठी घातक -  प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:35 IST

हा कायदा सर्वांच्या विरोधात आहे. विशेषत: भटक्या व बहुजन वर्गासाठी हा कायदा घातक ठरू शकतो, असा आरोप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एनआरसी कायद्याला मुस्लीम समाजाचा मोठा विरोध सुरू आहे. त्यामुळे हा कायद्या मुस्लीमविरोधी आहे, असा देखावा निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात हा कायदा सर्वांच्या विरोधात आहे. विशेषत: भटक्या व बहुजन वर्गासाठी हा कायदा घातक ठरू शकतो, असा आरोप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने अ‍ॅड.आंबेडकर यांनी शुक्रवारी कुटासा, सावरा, मुंडगाव, हिवरखेड, आडसुळ फाटा, निंबा फाटा, पारस, सस्ती आदी ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. यावेळी त्यांनी विविध विषयांवर परखड भाष्य केले. ते म्हणाले की, देशातील सत्ताधारी सध्या मनमानी पद्धतीने कायदे तयार करत आहेत. लोकांचा विरोध ते बेदखल करत आहेत. या सत्ताधाऱ्यांना चाप बसायलाच हवा. देशाच्या तिजोरीत देश चालविण्यासाठी आवश्यक असलेला पैसासुद्धा नाही.त्यामुळे ते विविध फंडे वापरत असून, सर्वसामान्यांना वेठीस धरून सर्व विकायला काढत असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने बोलताना त्यांनी शासनाच्या धोरणावर ताशेरे ओढले. शासन केवळ पर्यावरण बिघडल्याचे सांगते; परंतु त्यावरील उपाययोजना करीत नाही. अकोला जिल्ह्यातील पर्वतांच्या रांगेत मी शासनाला बी पेरणीची परवानगी मागितली; पण दिली नाही, असा आरोप त्यांनी केला. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करणारी एकमेव जि. प. ही अकोला आहे. त्यामुळे विकासाचे नियोजन करायचे असेल तर सरकारने जि. प. ला विकास निधी थेट द्यावा म्हणजे विविध योजना प्रभावीपणे राबविता येतील, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीAkolaअकोला