शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आता यंत्राने काढता येईल धुऱ्यावरील तण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 17:54 IST

डॉ. पंजाबराव देशमख कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाने नवे तण, गवत काप यंत्र तयार केले आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला: पिकातील तण ही शेतकऱ्यांना भेडसावणारी मोठी समस्या आहे. काही पिकातील तण जाळण्यासाठी बाजारात पीकनिहाय तणनाशके मोठ्या प्रमाणात आली आहेत; पण शेतरस्त्याच्या कडेचे तसेच शेताच्या धुºयावरील तण काढले जात नाही किंवा निर्मूलनही होत नाही. याच पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमख कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाने नवे तण, गवत काप यंत्र तयार केले आहे.शेतकºयांची गरज बघून या कृषी विद्यापीठाने आतापर्यंत तीसच्यावर विविध यंत्रे विकसित केली आहेत. या यंत्राचा अवलंबदेखील होत आहे. यातील तूर डाळ गिरणीची मागणी शेतकºयांकडून होत आहे. शेताच्या धुºयावरील गवताचा प्रश्न अलीकडे मांडला जात आहे. कपाशीवरील गुलाबी बोंडअळी ही धुºयावरील दरवर्षी निघणारे गवत, लहान झाडे यावरही उपजीविका करीत असल्याचे समोर आले आहे. तणनाशकामुळे गवत जाळता येते. तथापि, इतर पिकांवर तणनाशक फवाºयातून पडल्यास पीकही जळण्याची भीती असते. याच अनुषंगाने कृषी विद्यापीठाने गवत काप यंत्र विकसित करू न शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ट्रॅक्टर चलित हे यंत्र असून, या यंत्रात ब्लेड लावण्यात आले आहेत. यामुळे जवळपास ४ ते १० सेमीपर्यंत या यंत्राने झाडे व गवत कापले जाते. या यंत्राचा फायदा रस्त्याच्या कडेचे गवत कापण्यासाठी होईल. महापालिका, जिल्हा परिषद, बांधकाम विभागांतर्गत रस्त्याच्या कडेचे गवत, छोटी झाडे कापण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरणार आहे.हे यंत्र विकसित करण्यात आले आहे. तथापि, त्याला जॉइंट अ‍ॅग्रोस्कोची मान्यता मिळवावी लागणार आहे. येत्या मे महिन्यात राज्यातील चारही कृषी विद्यापीठाचा जॉइंट अ‍ॅग्रोस्को अकोल्यात होणार आहे. यामध्ये हे यंत्र मान्यतेसाठी ठेवले जाणार आहे.

 शेतकºयांची गरज बघता गवत, तण काप यंत्र विकसित करण्यात आले आहे. हे यंत्र धुºयावरील तणासह रस्त्याच्या कडेचे गवत व छोटी झाडेही कापता येणार आहेत. जॉइंट अ‍ॅग्रोस्कोची मान्यता प्राप्त होताच प्रसार करण्यात येईल.- डॉ. एस. एच. ठाकरे,कृषी अभियांत्रिकी,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkolaअकोला