शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आताचा काळ हा सर्वगुणसंपन्न असण्याचा  -  भगत सिंह कोश्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 15:11 IST

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३४ वा दीक्षांत समारंभात राज्यपाल बोलत होेते.

अकोला : शिक्षण प्रणालीत बदल होत असून, विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न असावा असे नवीन शिक्षण धोरण येत आहे. सर्वच क्षेत्रात काम करता यावे असे विद्यार्थ्यांचे एकात्मीक व्यक्तीत्व असणे गरजेचे आहे. देशाला पुढे न्यायचे असेल तर आपली तपस्या,साधना,त्यागाची भूमिका असली पाहिजे तेव्हाच आपल्यातून कार्यक्षम नवे शास्त्रज्ञ,सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडतील असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बुधवारी अकोला येथे विद्यार्थ्यांना केले.डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३४ वा दीक्षांत समारंभात राज्यपाल बोलत होेते. दीक्षांतपिठावर प्रमुख अतिथी म्हणून कृषीमंत्री दादाजी भुसे,कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष आदित्य कुमार मिश्रा तसेच डॉ.पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले,कुलसचिव डॉ. प्रकाश कडू यांची उपस्थिती होती.राज्यपालांच्याहस्ते ५० विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.पदवी व पदव्यूत्तर विद्यार्थ्यांनाही त्यांनी सामुहिक पदवी प्रदान केली.कृषीमंत्री भूसे यांनी कृषी विषयात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या ३० विद्यार्थ्यांना सुवर्णसह विविध ६४ पदके प्रदान केली.राज्यपाल म्हणाले, प्रत्येक जण आज नोकऱ्यांच्या शोधात आहे.सत्तेत जे होते नंतर नाहीत असे विरोधी पक्षाचे नेतेही नोकºयांचा प्रश्न उपस्थित करीत आहेत.पण मला सांगायचे आहे , मी गरीब कुटुंबातील आहे. खेड्यातून अनवानी पायाने येवून शालेय शिक्षण पूर्ण केले. पदवी,पदव्यूत्तरपर्यंतचे शिक्षण स्वत: काम करू न पूर्ण केले,महात्मा गांधी,सुभाषचंद्र बोस यांचा आर्दश डोळयासमोर ठेवून आम्ही वाटचाल केली. म्हणूनच आज मी एका महत्वाच्या राज्याचा राज्यपाल आहे. ही क्षमता प्रत्येकात आहे. तुमच्यातही भावी राष्टÑपती दडला आहे.म्हणूनच प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रात काम करता आले पाहिजे असे व्यक्तीत्व तयार होण्याची आजची खरी गरज आहे.आम्ही चंद्रयान मोहिम हाती घेतली,यावेळी यशस्वी झालो नाही पण आम्ही नक्कीच चंद्रावर यान पाठवू,त्यासाठी धेय्य निश्चित असल पाहिजे,कृषी क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी स्वामिनाथन होण्याचे स्वप्न बघून त्यादृष्टीने श्रम घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी