अकोला: पाणी र्मयादित असून, शेतीसह उद्योग व संबंधित व्यवसायात पाण्याचा मागणी वाढली आहे. र्मयादित पाण्याचा यथोचित वापर होणे ही काळाची गरज आहे. यासाठी पाण्याचे संवर्धन करावे लागणार असल्याचे प्रतिपादन पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई यांनी बुधवारी केले.१६ ते २२ मार्च दरम्यान राज्यासह जिल्ह्यात जलजागृती सप्ताहाचे आयोजन पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. या सप्ताहाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजीराव दिवेकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील नद्यांमधील जलपूजनाने करण्यात आली. यावेळी पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अकुंर देसाई उपस्थित होते. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे, कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार, कृषिभूषण दादाराव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी मिलिंद शेगावकर, माहिती अधिकारी युवराज पाटील, मनोज तायडे यांचीदेखील प्रमुख उपस्थिती होती. अंकुर देसाई यांनी माती आणि पाण्याचे पूजन करणे किती गरजेचे आहे, हे सांगताना शासनाने जलसंवर्धनासाठीच राज्यात जलजागृती अभियान सुरू केले असल्याचे सांगितले. या अभियानात शेतकरी, नागरिकांना सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.दिवेकर यांनी पाण्याचे जतन, संवर्धन हे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. या बाबीचा प्रसार शाळा-महाविद्यालयांपासून प्रत्येक कार्यालयाने करण्याचे आवाहन त्यांनी केले. भुईभार यांनी पाणी व मातीचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, पाण्याचे संकट बघता, मूलस्थानी जलंसधारणाचा कार्यक्रम इमानेइतबारे राबविण्याची गरज असून, झाडे लावणे व ते जगवणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. माँ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांनी जलसंवर्धन-संधारणाचा आदर्श आपल्याला घालून दिला आहे. त्यांची उजळणी महात्मा फुले यांनी ह्यशेतकर्यांचा आसूडह्णमधून केली आहे. म्हणून पूजेच्या नादी न लागता पाण्याचे संधारण व संवर्धनावर लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. लोळे यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणार्या जलजागृती अभियानाची माहिती प्रास्ताविकातून दिली.
आता जलसंवर्धनच तारणार - अंकुर देसाई
By admin | Updated: March 17, 2016 02:34 IST