शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
2
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्यूत्तर; किनी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
3
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
5
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
6
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
7
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
8
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
9
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
10
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
11
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
12
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
13
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
14
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
15
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
16
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
17
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
18
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
19
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
20
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 

आता मिळणार ‘रेड राइस’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 1:43 PM

अकोला : लोह आणि जस्ताचे प्रमाण अधिक असलेल्या ‘साकोली रेड राइस’ धान वाणाचे पहिले संशोधन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केले आहे.

अकोला : लोह आणि जस्ताचे प्रमाण अधिक असलेल्या ‘साकोली रेड राइस’ धान वाणाचे पहिले संशोधन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केले आहे. यावर्षी हे वाण पूर्वप्रसारित करण्यात आले असून, हेक्टरी ४५ क्ंिवटल उत्पादनाचा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे. प्रात्यक्षिकानंतर पुढच्या वर्षी हे वाण रोवणीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध केले जाणार आहे.विदर्भात धानाचे ८ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र असून, हे क्षेत्र राज्याच्या तुलनेत ५२ टक्के आहे. याच अनुषंगाने या कृषी विद्यापीठाने विविध तांदळाचे (धान) वाण विकसित केले. साकोली रेड राइस हा त्याचाच एक भाग आहे. यात गर्भवती महिलांसाठी लागणारे पोषक जस्त व लोह जीवनसत्त्व प्रमाण भरपूर आहे.रेड राइस बारीक लालसर दाण्याचा आहे. वाणाचा दाणा आखूड असून, दाण्याचे वजन १७.७ गॅ्रम आहे. १३५ दिवसांत येणारे वाण असून, उत्पादकता हेक्टरी ४५ क्ंिवटल आहे. कृषी विद्यापीठाचे डॉ. जी. आर. श्यामकुवर व डॉ. पी. जी. शेंडे यांनी या वाणावर संशोधनाचे काम केले आहे. यावर्षीच्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या संयुक्त कृषी संशोधन आढावा सभेत या वाणाचे पूर्वप्रसारण करण्यात आले. यावर्षी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर रेड राइसचे प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. कृषी विद्यापीठाचे सध्या सात क्ंिवटल बियाणे प्रात्यक्षिकासाठी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासाठी हवे असल्यास या वाणाचे बियाणे उपलब्ध केल्या जाणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, बारीक दाण्याचे पहिले लालसर वाण कृषी विद्यापीठाने विकसित केले.

- ‘साकोली रेड राइस’ धानाचे वाण यावर्षी विकसित करण्यात आले आहे. जस्त व लोहाचे प्रमाण भरपूर असलेल्या वाणाचे उत्पादन हेक्टरी ४५ क्ंिवटल आहे. प्रात्यक्षिकानंतर पुढच्या वर्षी शेतकºयांना हे वाण दिले जाईल.डॉ. विलास भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ