शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आता जीएसटीत दोन टक्के टीडीएस कपातीची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 12:59 IST

अकोला: व्यापार-उद्योगांतील अडीच लाखांच्या वरच्या प्रत्येक उलाढालीच्या सप्लायर्सच्या बिलातून दोन टक्के टीडीएस कापण्याची तरतूद (वस्तू आणि सेवा कर) जीएसटी प्रणालीत करण्यात आली आहे.

- संजय खांडेकर

अकोला: व्यापार-उद्योगांतील अडीच लाखांच्या वरच्या प्रत्येक उलाढालीच्या सप्लायर्सच्या बिलातून दोन टक्के टीडीएस कापण्याची तरतूद (वस्तू आणि सेवा कर) जीएसटी प्रणालीत करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी राज्यात १ आॅक्टोबरपासून जीएसटी प्रणालीत सुरू झाली आहे. जीएसटीतील या सुधारित प्रणालीच्या आदेशामुळे अनेक सप्लायर्स व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ व कें द्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ च्या कलम -५१ मध्ये वस्तू किंवा सेवा अथवा दोन्ही यांच्यावर मूळ स्रोतातून वजावट करण्याची (टीडीएस) तरतूद आली आहे. जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीपासून ही मागणी परिषदेसमोर आली होती; मात्र ती लागू झाली नव्हती. आता यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाने यासंदर्भात परिपत्रक काढले असून, त्याची अंमलबजावणी १ आॅक्टोबर १८ पासून करण्याचा आदेश दिला गेला आहे. केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा शासकीय अभिकरणांच्या अस्थापनांना वजावटी घोषित करण्यात आली आहे. जीएसटीच्या परिपत्रकानुसार आहरण आणि संवितरण अधिकारी यांना कारवाई करण्याचे निर्देशही प्राप्त झाले आहे. करपात्र वस्तू किंवा सेवा यातून दोन टक्के टीडीएस देयकांमधून वजावट कशी करावी, याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही वजावटदाराने कर म्हणून कपात केलेली रक्कम, त्याच महिन्याच्या समप्तीनंतर दहा दिवसांच्या आत शासन खात्यात भरणा करणे आवश्यक आहे. ही रक्कम वेळेच्या आत भरल्या गेली नाही तर १८ टक्के दरसाल व्याजाने दंड आकारण्याचे प्रावधान यामध्ये करण्यात आले आहे. पॅन आणि टॅन सोबत झालेल्या टीडीएस कपातीच्या प्रमाणपत्रावरून अनेकांना रकमेच्या परताव्याचा दावाही करता येणार आहे. 

आॅक्टोबरपासून अकोल्यातही दोन टक्के टीडीएस कपात सुरू झाली आहे. नव्याने तरतूद झालेल्या या आॅनलाइन प्रणालीसंदर्भात काही अडचणी असल्यात त्यांनी जीएसटी कार्यालयातील मदत कक्षाशी संपर्क साधावा.डॉ.अनिल करडेकरकर उपायुक्त, जीएसटी कार्यालय अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाGSTजीएसटी