शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्वोपचार’मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आता ‘पास’ प्रणाली

By atul.jaiswal | Updated: April 19, 2018 15:46 IST

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांसोबतचे नातेवाईक तसेच त्यांना भेटावयास येणाऱ्या नातेवाईकांना आता यापुढे रुग्णालय प्रशासनाकडून दोन विशिष्ठ पास देण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देशासनाने आदेशित केल्याप्रमाणे येत्या १ मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.रुग्ण भरती होते वेळी त्यांना आंतररुग्ण भरती नोंदणी खिडकीमधून दोन वेगवेगळ्या पासेस देण्यात येतील. सदर पास प्रणाली सुरु झाल्यानंतर प्रशासनास रुग्णसेवा देणे सुलभ होईल.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांसोबतचे नातेवाईक तसेच त्यांना भेटावयास येणाऱ्या नातेवाईकांना आता यापुढे रुग्णालय प्रशासनाकडून दोन विशिष्ठ पास देण्यात येणार आहेत. रुग्णालयातील वाढत्या गर्दीमुळे साफसफाई ठेवणे तसेच रुग्णसेवा देण्यात अडचणी येऊ नये, यासाठी शासनाने आदेशित केल्याप्रमाणे येत्या १ मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अकोला जिल्हा व लगतच्या इतरही जिल्ह्यांमधून रुग्ण उपचारासाठी भरती होतात. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. रुग्णांसोबत ५ ते ६ नातेवाईक असतात. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला रुग्णसेवा देणे, साफसफाई ठेवणे अडचणीचे ठरते. यासाठी शासनाने प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना पास प्रणाली सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाप्रमाणे उपाययोजना म्हणून १ मे २०१८ पासून रुग्णालयात भरती होणाºया रुग्णांसोबत असलेले नातेवाईक व भेटावयास येणाºया नातेवाईकांकरीता ‘पास प्रणाली ’ सुरु करण्यात येणार आहे. रुग्ण भरती होते वेळी त्यांना आंतररुग्ण भरती नोंदणी खिडकीमधून दोन वेगवेगळ्या पासेस देण्यात येतील. सदर पास प्रणाली सुरु झाल्यानंतर प्रशासनास रुग्णसेवा देणे सुलभ होईल. ही प्रणाली सुरळीतपणे लागू करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. दिनेश नेताम, डॉ. श्यामकुमार सिरसाम यांनी केले आहे.रुग्णासोबतच्या नातेवाईकांसाठी पिवळी पासरुग्ण भरती झाल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या एकून दोन नातेवाईकांना प्रत्येकी एक अशा दोन पिवळ्या रंगाच्या पास देण्यात येतील. सदर पास ही रुग्ण भरती झाल्यापासून तीन दिवस वैध राहिल. गरज भासल्यास पासचे नुतणीकरण करून घेता येईल. रुग्णाला सुटी झाल्यानंतर सदर पासेस कक्षामध्ये अधिपरिचारिकांकडे जमा करणे गरजेचे आहे.भेटीसाठी येणाऱ्यांना गुलाबी पासरुग्णांना भेटण्यासाठी येणाºया नातेवाइकांना गुलाबी रंगाच्या पासेस देण्यात येतील. दोन नातेवाईकांना ही पास देण्यात येईल. या पास वर रुग्णांना सायंकाळी ४ ते ५ या वेळेत भेटता येईल. ही पास देखील तीन दिवस वैध असेल. त्यानंतर पासचे नुतनीकरण करून घ्यावे लागेल.‘ओपीडी’मधील कक्षांचे क्रमांक बदललेसर्वोपचार रुग्णालयातील आंतररुग्ण कक्ष व बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) कक्षांचे क्रमांक सारखेच असल्यामुळे रुग्ण व सोबतच्या नातेवाईकांचा बरेच वेळा मोठा गोंधळ उडत होता. हा संभ्रम टाळण्यासाठी आता ‘ओपीडी’मधील कक्षांचे क्रमांक बदलण्यात आले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय